VIDEO : 50 लोक बसलेले असताना '360 डिग्री पाळणा' मधोमध तुटला, 23 जण गंभीर; थरकाप उडवणारा व्हिडीओ
Saudi Arabia amusement park accident : सौदी अरेबियातील तैफ शहरातील एका पार्कमध्ये एक मोठा अपघात झाला. 360 अंशात फिरणारा पाळणा मधोमध तुटलाय.

Saudi Arabia amusement park accident : सऊदी अरेबियातील तायफ शहरातील एका पार्कमध्ये मोठा अपघात झाला आहे. पार्कमध्ये लावलेला '360 डिग्री' फिरणारा पाळणा अचानक कोसळलाय. या दुर्घटनेत 23 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
लोक बसलेले असताना पाळणा तुटला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 31 जुलै रोजी घडली. पार्कमध्ये अनेक लोक फिरण्यासाठी आले होते. काही लोक 360 अंशात फिरणाऱ्या झोक्यावर बसले होते. त्याचवेळी हा पाळणा मधोमध तुटला. त्यानंतर पाळण्याचे दोन्ही भाग जमिनीवर कोसळले. या अपघातात 23 जण जखमी झाले आहेत.
Terrifying incident in Saudi Arabia.
— شكري المصعبي (@shukrey7) July 31, 2025
A ride named "360" at the Green Mountain park in Taif snapped mid-air, carrying nearly 30 people — many injured, some seriously.
This raises a global concern:
Are amusement rides regularly inspected worldwide?#RideAccident #AmusementPark pic.twitter.com/h6O9yFtmVn
घटनेचा व्हिडिओ समोर आला
या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, लोक पाळण्यात आनंद घेत होते, आणि अचानक झोका मधोमध तुटतो आणि खाली पडतो. या वेळी पाळण्यात बसलेले लोक घाबरून आरडाओरड करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक भयभीत झाले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत 23 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलंय.
प्रकरणाची चौकशी सुरू
एका वृत्तानुसार, या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पाळण्याचा खांब जोरात मागे वळला आणि दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या काही लोकांवर आदळला. काही लोक झोका कोसळत असताना त्यावरच बसलेले होते. त्यानंतर सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आणि मदतकार्य सुरू केले. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
Terrifying incident in Saudi Arabia.
— شكري المصعبي (@shukrey7) July 31, 2025
A ride named "360" at the Green Mountain park in Taif snapped mid-air, carrying nearly 30 people — many injured, some seriously.
This raises a global concern:
Are amusement rides regularly inspected worldwide?#RideAccident #AmusementPark pic.twitter.com/h6O9yFtmVn
इतर महत्त्वाच्या बातम्या























