Vivek Vaswani On Shah Rukh Khan: 'शाहरुख आणि माझे शारीरिक संबंध...'; अवघड प्रश्नावर विवेक वासवानीचं थेट उत्तर, प्रियंका चोप्राबाबतही सगळंच सांगितलं
Vivek Vaswani On Shah Rukh Khan: कित्येक वर्षांपूर्वी तर शाहरुख खानचा अत्यंत जवळचा मित्र विवेक वासवानी याच्यासोबतही शाहरुख खानचं नाव जोडलं गेलं होतं.

Vivek Vaswani On Shah Rukh Khan: बॉलिवूड (Bollywood) आणि इंडस्ट्रीतली झगमगती दुनिया. इथे येण्याचं प्रत्येकालाच आकर्षण असतं. पण, जेवढी लखलखणारं हे जग दिसतं, त्यापेक्षा फारच वेगळं आहे. इथे अनेक गोष्टी घडतात, काही गोष्टींची चर्चा दबक्या आवाजात होते, तर काहींचा गाजावाजा होतो. अशीच काही बॉलिवूडची प्रकरणं समोर आलेली. बरं या चर्चांपासून सुपरस्टार शाहरुख खानही वाचला नाही बरं का... बॉलिवूडचा 'वन वुमन मॅन' असं शाहरुख खानला (Shah Rukh Khan) म्हटलं जातं. पण, असं असूनही त्याचं नाव कधी प्रियंका चोप्रासोबत (Priyanka Chopra), तर कधी करण जोहरसोबत (Karan Johar) जोडलं गेलं. शाहरुख खानचे करण जोहरसोबत संबंध होते, असा दावाही करण्यात आलेला.
कित्येक वर्षांपूर्वी तर शाहरुख खानचा अत्यंत जवळचा मित्र विवेक वासवानी याच्यासोबतही शाहरुख खानचं नाव जोडलं गेलं होतं. अशातच विवेक वासवानीनं एका मुलाखतीत बोलताना या विषयावर भाष्य केलं आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत वासवानीनं मित्र शाहरुखच्या नात्याबद्दल आणि कथित अफेअरबद्दल मौन सोडलं आहे.
कदाचितच तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, विवेक वासवानी आणि शाहरुख खानच्या शारीरिक संबंधांबाबत अनेक बातम्या समोर आलेल्या. मुलाखतीत विवेकला विचारलं गेलं की, त्याचे कधी शाहरुख खानशी संबंध होते का? तर यावर बोलताना तो म्हणाला की, 'संबंध? म्हणजे? लैंगिक संबंध? नाही. तो (शाहरुख) तसा नाही.'
शाहरुखसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा विचारही करू शकत नाही : विवेक वासवानी
विवेक वासवानी पुढे बोलताना म्हणाला की, "ही अफवा कुठून आली हे मला माहीत नाही. आम्ही घरी राहत होतो. आई आणि बाबा होते, तणाव होता, करिअर होते. लवकरच गौरीशी लग्न करायचं होतं... त्यात रिलेशनशिप कशी आणि कुठून आली? विवेक वासवानी म्हणाले की, ती फक्त एक मैत्री होती. तो शारीरिक संबंध ठेवण्याचा विचारही करू शकत नाही.
शाहरुखच्या करण जोहरसोबतच्या नात्याची बातमीही खोटी
विवेकनं शाहरुखच्या करण जोहरसोबतच्या शारीरिक संबंधांनाही नकार दिला. तो म्हणाला, "शाहरुखच्या करणसोबतच्या नात्यामुळे अनेकांनी असं करण्याचा प्रयत्न केला. पण जसजसे तुम्ही मोठे स्टार बनता तसतसे तुमचा दर्जा वाढतो, लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागतात. पण हे सर्व खरं नाही..."
जेव्हा विवेक वासवानी आणि शाहरुख त्यांच्या संघर्षाच्या काळात एकाच घरात एकत्र राहत होते, तेव्हा लोक असा अंदाज लावू लागले की, दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. असाही दावा करण्यात आला होता की, विवेक शाहरुखच्या संघर्षाच्या काळात त्याचा खर्च उचलत असे. एवढंच नाही तर तो शाहरुखला लोकांना भेटण्यासाठी सोबत घेऊन जायचा.
प्रियंका आणि करणसोबतच्या अफेअरच्या चर्चा खोट्या
विवेक वासवानीनं बोलताना प्रियंका आणि शाहरुखच्या अफेअरच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं आहे. 'डॉन 2' चित्रपटात एकत्र काम करताना शाहरुख आणि प्रियांकाची नावं जोडली गेली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, प्रियांकासोबतच्या अफेअरमुळे शाहरुखचं गौरीशी भांडण झालं होतं. पण विवेक वासवानी यांनी या अफेअरच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, "हे खरं नाही. जेव्हापासून मी त्याला ओळखतो, तेव्हापासून तो एक महिला पुरुष आहे. त्याच्या आणखी किती अफेअर्स किंवा फ्लिंग्जबद्दल तुम्ही ऐकलंय? आम्ही प्रियांका चोप्राबद्दल फक्त एक अफवा ऐकली आहे आणि ती देखील एक अफवा आहे. तो असा माणूस नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























