Make in India Initiative: एलॉन मस्क यांच्यानंतर आता व्लादिमीर पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन, मेक इन इंडियाचे केले कौतुक
Make in India Initiative: व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या 'मेक इन इंडिया'चे कौतुक केले आहे.
Make in India Initiative: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (VLADIMIR PUTIN) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसेच मोदींच्या 'मेक इन इंडिया' संकल्पनेचेही कौतुक केले. पुतिन यांनी 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे कौतुक करत पंतप्रधान मोदींना आपले मित्र मानले. 29 जून रोजी मॉस्को येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन म्हणाले की, आमचे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया संकल्पना सुरू केली. ज्याचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत.
When Putin gives example of Prime Minister Modi’s ‘Make in India’ and the impact it has had on India’s economic fortunes… pic.twitter.com/JnqE7sXvRw
— Amit Malviya (@amitmalviya) June 29, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वकांक्षी योजना 'मेक इन इंडिया'ची जादू संपूर्ण जगावर दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री सर्वांना माहिती आहे. व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या 'मेक इन इंडिया'चे कौतुक केले आहे. मेक इन इंडियाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झाल्याचे ते म्हणाले. रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाचे उदाहरण झाले आहे.
रशियात स्वदेशी उत्पादनांवर भर देण्यात यावा
रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरूच आहे. यामुळे रशियाला मोठ्या प्रमाणात कठोर आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. या निर्बंधांमुळे व्यवसायांसाठीच्या बाजारपेठा बंद असल्याने रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या 'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर रशियात स्वदेशी उत्पादनांवर भर देण्यात यावा आणि आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देशातच तयार करण्याचे पुतीन यांनी आवाहन केले आहे.
'मेक इन इंडिया'चा भारतीय अर्थव्यवस्थेवर अतिशय चांगला परिणाम
देशातून पाश्चिमात्य कंपन्या निघून गेल्याने रशियन उद्योजकांच्या संधी वाढल्या आहेत.त्यामुळे देशांतर्गत ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी रशियाला नवीन धोरणाची गरज आहे. रशियाचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली. 'मेक इन इंडिया'चा भारतीय अर्थव्यवस्थेवर अतिशय चांगला परिणाम झाला आहे असे पुतीन यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये सुरु केलेल्या 'मेक इन इंडिया' मोहिमेला आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मानलं जात आहे. भारताच्या उत्पादनांनी ग्राहकांची मनं जिंकली आहेत. भारतीय उत्पादनांना ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे.