Vladimir Putin Met Prigozhin: वॅगनर्सच्या बंडाच्या 5 दिवसांनी पुतिन आणि वॅगनर चीफ प्रीगोझिन यांची भेट; बड्या अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा
Russia-Wagner Chief: प्रीगोझिन यांचा रशियाच्या सर्वोच्च लष्करी अधिकार्यांशी दीर्घकाळ चाललेला संघर्ष 24 जून रोजी वॅगनरच्या नेतृत्वाखाली सशस्त्र बंडखोरीला कारणीभूत ठरला.
Russia-Wagner Chief: रशियामध्ये (Russia) काही दिवसांपूर्वी अराजक परिस्थिती निर्माण झालेली. रशियातील खासगी सैन्य असलेल्या वॅगनर (Wagner Group) यांनी पुतीन यांनाच आव्हान देत. मॉस्कोवर (Moscow) ताबा मिळवण्याच्या दिशेनं कूच केली होती. तसेच, बंडाचे निशाण फडकावल्यानंतर वॅगनर यांनी काही शहरांवर ताबा मिळवला असल्याचे दावा करण्यात आला. याचसंदर्भात आता एका बड्या अधिकाऱ्यानं याच घटनेसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. वॅगनर यांच्या बंडाच्या 5 दिवसांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी वॅगनरचे नेते येवगेनी प्रीगोझिन (Yevgeny Prigozhin) यांची भेट घेतली होती.
एपीच्या वृत्तानुसार, क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 29 जून रोजी पुतीन आणि वॅगनरचे नेते येवगेनी प्रीगोझिन यांच्यात तीन तासांची बैठक झाली आणि त्यात प्रीगोझिननं स्थापन केलेल्या लष्करी कंपनीच्या कमांडरचाही समावेश होता.
वॅगनर आर्मीचे सैनिक युक्रेनमध्ये रशियन सैन्यासोबत लढले. प्रीगोझिन यांचा रशियाच्या सर्वोच्च लष्करी अधिकार्यांशी दीर्घकाळ चाललेला संघर्ष 24 जून रोजी वॅगनरच्या नेतृत्वाखाली सशस्त्र बंडखोरीला कारणीभूत ठरला. त्यानं रशियामध्ये आपल्या सैनिकांचं नेतृत्व केलं. बेलारूसमध्ये हद्दपारीच्या करारानंतर वॅगनरच्या मुख्य प्रीगोझिननं बंडखोरी संपवली.
युद्धभूमीवरील कामांचे मुल्यांकन
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, 29 जूनच्या बैठकीत पुतीन यांनी युक्रेनमधील युद्धभूमीवर वॅगनरच्या कृती आणि 24 जूनच्या घटनांचं मूल्यांकन सादर केलं. क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनं सांगितलं की, अध्यक्षांनी कमांडर्सचं स्पष्टीकरण देखील ऐकलं आणि त्यांना पुढील रोजगार आणि युद्धात पुढील सहभागाची ऑफर दिली.
बैठकीदरम्यान कमांडर्सनी आपापले मुद्दे व्लादिमीर पुतीन यांच्यासमोर ठेवले. त्यांनी अधोरेखित केलं की, ते राज्याचे प्रमुख आणि सेनापती यांचे कट्टर समर्थक आणि सैनिक आहेत. ते मातृभूमीसाठी लढायला तयार आहेत.
व्लादिमीर पुतीन यांचं देशाला संबोधन
24 जून रोजी रशियाविरुद्ध बंड केल्यानंतर, वॅगनर चीफच्या सैनिकांनी मॉस्कोकडे कूच करण्यास सुरुवात केली. ते फक्त 200 किलोमीटर अंतरावर उपस्थित होते. बंडाची बातमी मिळताच व्लादिमीर पुतीन यांना सावध करण्यात आलं आणि त्यांनी तात्काळ मॉस्कोच्या रस्त्यावर सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले. यावेळी मॉस्कोच्या रस्त्यावर सैन्य तैनात करण्यात आलं. व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्राला संबोधित केलं आणि वॅगनर चीफला देशद्रोही ठरवलं. तसेच, वॅगनर्सनी त्याच्या पाठीत वार केल्याचंही सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Russia: वॅगनर म्हणजे आहेत तरी कोण? पुतीनच्या इशाऱ्यावर काम करणारे आज त्यांच्यावर उलटले!