Russia-Ukraine War LIVE : युक्रेनसोबत चर्चेला रशियाची तयारी; रशिया-युक्रेन युद्धाचे सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Russia-Ukraine War LIVE : रशियाकडून अखेरीस युद्धाची घोषणा, पुतीन यांच्या आदेशानंतर युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ले, रशियाच्या आक्रमक पवित्र्याने जग धास्तावलं
LIVE
Background
Russia Ukraine Crisis : रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. एएपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे.
युक्रेनमध्ये आणीबाणी
युक्रेनमध्ये बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाचं सैन्य सीमारेषेजवळ येत असल्याने तसंच परिस्थिती आणखी चिघळत असल्याने बुधवारी (23 फेब्रुवारी) युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने (Ukraine security council) हा निर्णय घेतला आहे.
ही आणीबाणी संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. केवळ रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेस्तक आणि लुहान्स्कच्या पूर्वेकडील प्रदेश वगळला आहे, याठिकाणी 2014 पासून आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. ही आणीबाणीची स्थिती 30 दिवसांपर्यंत लागू असणार असून यामध्ये देशभरात सुरक्षायंत्रणा अधिक कडक करत वाहन तपासणी तसंच इत्यादी गोष्टी वाढवण्यात येतील. तसंच परिषदेच्या या मागणीला लागू होण्यापूर्वू संसदेची मंजुरी आवश्यक आहे. सुरक्षा परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी ही माहिती दिली.
भारतीय नागरिकांना घेऊन विमान आज 4 वाजता मुंबईत दाखल होणार, महापौर किशोरी किशोर पेडणेकर स्वागत करणार
युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे निर्वासन विमान दुपारी ४ वाजता मुंबईत दाखल होत आहे. आज महापौर किशोरी किशोर पेडणेकर हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरितांचे स्वागत करतील.
Palghar News Updates : पालघरमधील 12 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, सर्व एमबीबीएसचे विद्यार्थी, जिल्हा प्रशासनाची माहिती
Palghar News Updates : पालघरमधील 12 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले. सर्व एमबीबीएसचे विद्यार्थी. जिल्हा प्रशासनाची माहिती. वाडा , पालघर , वसई , विक्रमगड तालुक्यातील विद्यार्थी. सर्व विद्यार्थी कुटुंबाच्या संपर्कात . मात्र भीतीच्या वातावरणात असल्याची विद्यार्थ्यांच्या पालकांची माहिती
Nanded News Updates : नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची माहिती
युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान दुपारी 4 वाजता मुंबईत येणार
युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान दुपारी 4 वाजता मुंबईत दाखल होत आहे. आज केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत करतील.
Air India evacuation flight from Romania carrying Indian citizens evacuated from Ukraine is arriving in Mumbai at 4 p.m. today
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) February 26, 2022
Union Minister Shri Piyush Goyal will receive the evacuees at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbaihttps://t.co/KRzKlKpepz
रायगड जिह्यातील सुमारे 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
रायगड जिह्यातील सुमारे 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. कर्जत, नागोठणे, खोपोली, महाड, माणगाव, पनवेल, खालापूर,पेण, तळा, अलिबाग येथील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.