(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral: पाणी टाकत निष्क्रिय केला 'रशियन बॉम्ब', युक्रेनच्या नागिरकांचा अजब कारनामा; पाहा व्हिडीओ
Russia Ukraine War Viral Video: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 24 वा दिवस आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे.
Russia Ukraine War Viral Video: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 24 वा दिवस आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज पाहायला मिळत आहेत. या युद्धात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर आतापर्यंत युक्रेनच्या लाखो नागरिकांनी देश सोडत इतर देशांमध्ये शरणागती पत्करली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओर दोन युक्रेनियन बॉम्ब डिफ्युज करणारे कर्मचारी रशियन बॉम्ब निकामी (Bomb defusing process) करताना दिसत आहेत.
या कर्मचाऱ्यांची बॉम्ब निकामी करण्याची पद्धत खूपच अजब आहे. या कर्मचाऱ्यांनी फक्त एका पाणीच्या बाटलीच्या साहाय्याने हा रशियन बॉम्ब निकामी केला आहे. 31 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला काही तासातच 3.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओत रशियाकडून डागण्यात आलेले रॉकेट ब्लास्ट न होताच जमिनीवर पडलेला दिसत आहे. हाच बॉम्ब पाणीच्या साहाय्याने निकामी करताना हे दोन युक्रेनियन कर्मचारी दिसत आहेत.
Bomb defusing process pic.twitter.com/AZeMaesE6K
— NEXTA (@nexta_tv) March 9, 2022
हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया.'' हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी आपल्या वेगवगेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यामध्येच एका नेटकाऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे की, हा व्हिडीओ पाहताना माझा श्वास थांबला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपणार? दोन्ही देश कराराच्या जवळ, रशियन अधिकाऱ्याचा दावा
- Russia Ukraine War : रशियन सैनिकांकडून वयोवृद्ध महिलांवर अत्याचार नंतर फाशी : युक्रेनच्या खासदाराचा गंभीर आरोप
- Russia Ukraine War : चक्क पाण्यानं केला बॉम्ब निकामी; युक्रेनच्या सैनिकांचा कारनामा, Video व्हायरल
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाबाबत शी जिनपिंग यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...