एक्स्प्लोर

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सूचना, 'जिथे आहात तिथेच रहा'

Russia Ukraine War : युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सध्या स्थिती चांगली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीयांनी आता जिथे आहात तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे.

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात सातत्याने अडचणी येत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सूचना (Advisory) जारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सध्या परिस्थिती वाईट असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भारतीयांना जिथे आहात तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे. नव्या आदेशानुसार, युक्रेनमधील भारतीयांनी घाबरून न जाता स्वत:ला सुरक्षित ठेवणे आता महत्त्वाचे आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे. 

परिस्थितीत थोडी सुधारणा होताच पूर्वेकडील भागातील लोकांना बाहेर काढणे शक्य होणार आहे. यादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीची बैठक झाली, ज्यामध्ये युक्रेन-रशियाचा युद्धाचा मुद्दा गाजला. या बैठकीत सरकारने सांगितले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी सरकारने नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे.

एकीकडे पोलंड आणि हंगेरीसारख्या देशांनी युक्रेनमधून पळून जाणाऱ्या युक्रेनच्या नागरिकांचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे युक्रेन सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही भारतीय नागरिकांनी पोलंडच्या सीमेवर अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. पोलंडमधील एका भारतीय स्वयंसेवकाने रविवारी सांगितले की युक्रेनमधून पोलंडला जाण्याचा प्रयत्न करणारे काही भारतीय नागरिक मेडिकाकडे जाणाऱ्या सीमेवर अडकले असून पोलंडमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.

कीव्हमधील भारतीय दूतावासाने रविवारी सांगितले की, भारतीय नागरिकांना युक्रेनमधून रोमानिया आणि हंगेरीमार्गे परत आणले जात आहे, परंतु काही अज्ञात नागरिक पोलंडच्या सीमेवर पोहोचले आहेत आणि तेथे अडकले आहेत. रुचिर कटारिया नावाच्या स्वयंसेवकाने असोसिएटेड प्रेसला सांगितले की, मेडिका सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भारतीयांना रोमानियाला जाण्यास सांगण्यात आले.

कटारिया म्हणाले की, तथापि, त्यांनी आधीच सीमेपर्यंत पायी लांबचा प्रवास केला आहे आणि शेकडो किलोमीटर दूर असलेल्या रोमानियाच्या सीमेपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. अहवालानुसार, पोलंडमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झालेल्या इतर काही भारतीय नागरिकांना पोलिश अधिकारी आणि धर्मादाय संस्थांनी स्थापन केलेल्या निवारागृहात राहण्यासाठी जागा दिली जात नाही. कटारिया यांच्या पत्नी मॅग्डालेना बारसिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा युक्रेनच्या नागरिकांसाठी राखीव असल्याचे भारतीय नागरिकांना सांगितले जात आहे. बारसिक आपल्या पतीसह युक्रेनमधून पळून जाणाऱ्या भारतीय नागरिकांना मदत करत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 न्यूज : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 4.30 PM : 16 July 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis : भाजपकडून विठ्ठल भक्तांसाठी विशेष ट्रेन रवाना, फडणवीस म्हणाले...Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 16 July 2024 : ABP MajhaPooja Khedkar Case : अपंगत्वाचं प्रमाणपत्र रेशन कार्ड दाखवून मिळवलं : विजय कुंभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात दोन IPS  अधिकारी आमने-सामने, 300 पानांच्या आरोपपत्रात 102 जणांचे जबाब
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात दोन IPS अधिकारी आमने-सामने, 300 पानांच्या आरोपपत्रात 102 जणांचे जबाब
Embed widget