Russia Ukraine Crisis : युद्धाला जाण्याआधी वडिलांनी घेतली मुलीची भेट, भेटीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल
Ukraine Father Emotional Video : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता युक्रेनच्या एका बाप-मुलीच्या व्हिडिओने लोकांचे डोळे पाणावले आहेत.
Ukraine Father Emotional Video : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेनंतर रशियन लष्कराने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले. अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाल्याचीही माहिती आहे. युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे. अशा स्थितीत युक्रेनमधील नागरिकांना युद्धाच्या परिस्थितीत सैन्यात भरती करण्यात येत आहे.
रशियन हल्ल्यानंतर सोशल मीडियावरही अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओंमध्ये रशियाने केलेला विध्वंस दिसत आहे, तर काही व्हिडिओंमध्ये लोक आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था करताना दिसत आहेत. युक्रेनच्या बाप-मुलीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीला आणि कुटुंबाला निरोप देताना दिसत आहे.
येथे पूर्ण व्हिडिओ पाहा :
A Ukrainian father says goodbye to his family, while he stays behind to fight the Russians😭#Ukraine #StopWar pic.twitter.com/g3DuFKM5Op
— Lil (@lil_whind) February 24, 2022
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या काही भागात लष्करी हालचाली तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत युक्रेनचे नागरिक लष्करात भरती होत आहेत. रशियाशी लढायला जाण्यापूर्वी लोक त्यांच्या कुटुंबियांना भेटून निरोप देताना दिसतात. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की मुलगी तिच्या वडिलांना भेटत आहे आणि दोघांच्याही डोळ्यात अश्रू आहेत. दोघेही एकमेकांना भेटून रडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अतिशय भावनिक असून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : युद्धाच्या पहिल्याच दिवशी युक्रेनमध्ये 137 जणांच्या मृत्यू, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ
- Russia Ukraine War : युक्रेनवरील हल्ल्यानंतर ब्रिटनने रशियावर लादले नवे निर्बंध, रशियन बँका लंडनच्या आर्थिक व्यवस्थेबाहेर
- Russia Ukraine War : 'आई-बाबा...'; युक्रेनच्या सैनिकाचा भावूक व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha