Russia Ukraine War : युक्रेनचा मोठा दावा, 17 हजार रशियन सैन्य ठार, 605 रणगाडे उद्धवस्त
Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून 17 हजार रशियन सैन्य ठार झाल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन दरम्यान 35 व्या दिवशीदेखील युद्ध सुरू आहे. रशियन सैनिकांकडून सातत्याने युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची काही शहरं बेचिराख झाले आहेत. तर, युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियाचे 17 हजार सैन्य ठार झाले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
दोन्ही देशातील हजारो सैनिकांना प्राण गमवावे लागले आहेत. युक्रेनमधील जवळपास 50 लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. रशियाच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार युक्रेनकडून सुरू आहे. युक्रेनच्या सैन्याने केलेल्या दाव्यानुसार, 24 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 17 हजार 300 रशियन सैन्य ठार झाले आहे. त्याशिवाय युक्रेनच्या सैन्याने रशियाचे 605 रणगाडे उद्धवस्त केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय अॅण्टी एअरक्राफ्ट वॉरफेअर सिस्टम, रॉकेट लाँच सिस्टमसह 130 हून अधिक लढाऊ विमाने पाडल्याचा दावा युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने केला आहे.
>> युक्रेनच्या दाव्यानुसार रशियाचे किती नुकसान
> 17,300 रशियन सैनिक मारले गेले
> 1,723 रशियन बख्तरबंद वाहने नष्ट
> रशियाचे ६०५ रणगाडे उद्ध्वस्त झाले
> 1,184 लष्करी वाहने
> 54 विमानविरोधी युद्ध प्रणाली नष्ट
> 96 रॉकेट प्रक्षेपण यंत्रणा नष्ट
> 131 विमाने खाली पाडली
> 75 इंधन टाकी वाया गेली
> 131 हेलिकॉप्टर खाली पाडले
> 81 UAVs
पुतिन-झेलेन्स्की समोरासमोर भेटणार?
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू असतानाच दोन्ही देश युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. याच अनुषंगाने मंगळवारी तुर्कीतील इस्तंबूल येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) यांची भेट होण्याची शक्यता आहे.
युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झेलेन्स्की आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात लवकरच बैठक होऊ शकते. इस्तंबूलमध्ये युक्रेनियनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या पहिल्या फेरीच्या चर्चेपासून रशियन शिष्टमंडळही यासाठी आशावादी होते. परंतु, चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी दोन्ही देशांचे शिष्टमंडळ भेटले.