Russia Ukraine crisis : रशियाने क्रिमियातील लष्करी युद्ध अभ्यास संपल्याची घोषणा, यूक्रेन सीमेवरुन प्रथमच सैन्य मागे
Russia Ukraine crisis : रशिया आणि युक्रेनमधील जवळजवळ दोन महिन्यांपासून असलेले युद्ध हळूहळू ओसरू लागले आहेत. रिपोर्ट्सनुसार, रशियाने माघार घेण्याची घोषणा केली आहे.
Ukraine Crisis : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान बुधवारी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने माघार घेण्याची घोषणा केली आहे. लष्कराच्या जवानांनी माघार घ्यायला सुरुवात केली आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेक दिवसांपासून युद्धाची परिस्थिती आहे. 16 फेब्रुवारीला रशिया युक्रेनवरही हल्ला करू शकतो, असे संकेत स्पष्टपणे दिसत होते. या परिस्थितीवर अमेरिकेनेही युद्ध न करण्यास रशियावर दबाव आणायला सुरुवात केली होती. या सगळ्यात बुधवारी लष्कराच्या माघारीच्या बातमीने मोठा दिलासा मिळाला आहे.
Russia announces end of Crimea military drills, troops leaving: AFP News Agency
— ANI (@ANI) February 16, 2022
रशियाने युद्ध मागे घेण्याची घोषणा करताच 'हे' बदल झाले
- रशियाने क्रिमियातील लष्करी युद्ध अभ्यास संपल्याची घोषणा, यूक्रेन सीमेवरुन प्रथमच सैन्य मागे झाले.
- रशियाच्या निर्णयाने भारतीय बाजार सावरला. सकाळपासून अस्थिर असलेला बाजार वधारला.
- सेन्सेक्स 185 अंकांनी वधारला तर निफ्टी 65 अंकांनी वर झाला.
- लष्करी तुकड्या एक पूल ओलांडून जातानाचा व्हीडिओ रशियन दूरचित्रवाहिन्यांवर प्रकाशित
- तेलाचे भावही कालपासून स्थिर, पावर, रिॲलिटी, तेल आणि गॅस क्षेत्रातील समभागात वृद्धी
महत्वाच्या बातम्या :
- Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?
- Elon Musk यांनी दान केले टेस्लाचे 5.7 अरब डॉलर्स किंमतीचे शेअर्स
- Ukraine-Russia : धोका टळला? युक्रेनजवळ तैनात असलेल्या रशियन सैन्याची पुन्हा घरवापसी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha