एक्स्प्लोर

Russia - Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाचे 100 दिवस! संपूर्ण जगासह भारतालाही मोजावी लागली मोठी किंमत?

Russia - Ukraine War Impact On India : रशिया-युक्रेन युद्धाचे 100 दिवस. भारतावरही मोठा परिणाम. जाणून घ्या सविस्तर

Russia - Ukraine War Impact On India : तब्बल 100 दिवसांपासून सुरु असणाऱ्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धानं संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. गेल्या 100 दिवसांत भारतासह संपूर्ण जगावर त्याचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलासह सर्वच वस्तूंच्या किमती भडकल्या. युद्धामुळे युक्रेनमधून होणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यानं गव्हासह (Wheat) सूर्यफूल तेलाच्या किमती (Sunflower Oil) गगनाला भिडू लागल्यात. अशातच सरकारनं गव्हाच्या निर्यातीवर बंदी देखील घातली. पण देशात वाढणारी महागाई काही थांबण्याचं नाव घेईना. वाढत्या महागाईची दखल भारतीय रिझर्व्ह बँकेलाही घ्यावी लागली. परिणामी RBI नं रेपो दरात (Repo Rate) वाढ केली आणि कर्ज महागलं. म्हणजे, महागाई (Inflation) काही देशवासियांची पाठ सोडेनाच. ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलंय त्या लोकांचे कर्जाचे हफ्ते (EMI) महाग झाले. महागाई वाढल्यानं मागणीवर परिणाम होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे शेअर बाजारातही मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. या काळात विदेशी गुंतवणूकदारांनी (Foreign Investors) बाजारात विक्रमी विक्री केल्यानं गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचं नुकसान झालं. रशिया-युक्रेन युद्धामुळं भारतावर काय परिणाम झाला ते सविस्तर जाणून घेऊया... 

महागाईचं सावट 

रशिया युक्रेन युद्धानं भारतातील सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे. खाद्यपदार्थांपासून ते इंधन, नैसर्गिक वायू, स्टील, अॅल्युमिनिअमपर्यंत अनेक वस्तू महागल्या आहेत. किरकोळ महागाईत झालेली वाढ हा त्याचा पुरावा आहे. जानेवारीमध्ये किरकोळ महागाई दर हा 6.01 टक्के होता, तो एप्रिलमध्ये 7.79 टक्के इतका झाला. गहू, मैदा, खाद्यतेलाच्या किमती वाढल्यानं महागाई दरांतही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं असून एप्रिल 2022 मध्ये 8.38 टक्के इतका होता. तर जानेवारी 2022 मध्ये हा दर 5.43 टक्के इतका झाला आहे. 

परकीय चलनाचा साठा 5.38 टक्क्यांनी घटला

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम परकीय चलनावर मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून आलं. डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाची घसरण होत असल्यानं भारताच्या परकीय चलन साठ्यात (Foreign Currency Reserves) सातत्यानं घट होत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळं, देशातील विदेशी गुंतवणूकदार (Foreign Investors) सतत पैसे काढून घेत आहेत आणि कमी जोखमीच्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. 

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) रुपयाची घसरण रोखण्याचा प्रयत्न केला. पण तरिही मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 77.77 रुपयांपर्यंत घसरला होता. आरबीआयनं आपल्या स्टेट ऑफ इकॉनॉमी अहवालात (State Of Economy Report) म्हटलं आहे की, रुपया आणखी कमकुवत होऊ नये म्हणून मार्च 2022 मध्ये त्यांच्या नाणेनिधीतून 20 अब्ज डॉलर विकण्यात आले आहेत. 

RBI नं आपल्या स्टेट ऑफ इकॉनॉमी अहवालात म्हटलं आहे की, 20 मे पर्यंत, भारताकडे 598 डॉलर अब्ज परकीय चलनाचा साठा आहे. ज्यातून पुढील 10 महिन्यांतील केवळ अंदाजे आयात पूर्ण केली जाऊ शकते. युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताकडे 632 अब्ज डॉलरचा परकीय चलन निधी होता. युद्धानंतर परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यापासून परकीय चलन निधी 36 अब्ज डॉलरनी कमी झाला आहे. 

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण 

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहे. जागतिक अस्थिरतेमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्यानं रुपयानं डॉलरच्या तुलनेत 77.72 ही आतापर्यंतची सर्वात निचांकी पातळी पाहिली आहे. 23 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी, डॉलरच्या तुलनेत रुपया 74.62 रुपये प्रति डॉलर होता. जो 2 जून 2022 रोजी 77.56 रुपयांवर आला. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयने अनेक नवी पावलं उचलली. 

RBI ने स्वतःकडील डॉलर विकले. परंतु, विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक सातत्यानं विकून गुंतवणूक काढून घेत आहेत, त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सातत्यानं घट होत आहे. 2022 मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 1.57 लाख कोटी रुपये काढले आहेत. जर रुपयाची सातत्यानं होणारी घसरण रोखली नाही, तर रुपयाच्या घसरणीमुळे महागाईचा आणखी मोठा फटका जनतेला बसू शकतो. एवढंच नाहीतर आयात महाग होऊ शकते, अशा स्थितीत कंपन्या थेट सर्वसामान्यांवर बोजा टाकतील. अनेक तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होऊन 80 रुपये प्रति डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. 

युद्धामुळे जीडीपी अपेक्षेपेक्षा कमी

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम देशाच्या जीडीपीवरही झाला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात GDP 8.7 टक्के इतका होता. दरम्यान, जानेवारी 2022 मध्ये सांख्यिकी विभागानं जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजात, तो GDP च्या 9.2 टक्के असल्याचा अंदाज होता. नंतर फेब्रुवारीमध्ये सांख्यिकी विभागानं दुसऱ्या अंदाजात जीडीपी 8.9 टक्के राहू शकतो, असा अंदाज व्यक्त केला होता. पण 31 मे 2022 रोजी आलेल्या 2021-22 च्या GDP च्या आकडेवारीमध्ये, आर्थिक वर्षातील GDP अंदाजापेक्षा 8.7 टक्के कमी आहे. खरं तर याचं प्रमुख कारण रशिया-युक्रेन युद्ध. युद्धामुळे वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या. पेट्रोल डिझेल महागलं. महागाई वाढल्यानं मागणी कमी झाली आणि त्यामुळे जीडीपी अंदाजापेक्षा कमी आला. 

कच्च्या तेलाच्या किमतींत उच्चांकी वाढ 

रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्वाधिक परिणाम हा कच्च्या तेलाच्या किमतींवर झाल्याचं पाहायला मिळालं. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 139 डॉलर पर्यंत पोहोचली होती. ही 2008 नंतरची सर्वोच्च किंमत होती. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ केली. मात्र महागाईनं होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केली. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात तब्बल 6 रुपयांनी कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली आले. मात्र आता सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीसाठी मोठा तोटा सहन करावा लागत आहे.  

जगासाठी रशियन-युक्रेन युद्धाची किंमत

संयुक्त राष्ट्र संघाच्या माहितीनुसार, रशिया-युक्रेन युद्धामुळं पुढच्या पिढ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. युद्ध सुरु झाल्यापासून एका दिवसांत अंदाजे 2 मुलं मारली गेली आहेत. म्हणजेच, रशियन हल्ल्यामुळं आतापर्यंत तब्बल 243 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेनच्या मुख्य अभियोक्ता कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्यानं केलेल्या हल्ल्यांमुळं आणखी 446 मुलं जखमी झाली आहेत. तसेच, युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून किमान 4,149 नागरिक मारले गेले आणि 4,945 जखमी झाले आहेत. ही संख्या अंदाजे वर्तवण्यात आली असून खरी संख्या यापेक्षाही जास्त असल्याचा दावा वारंवार युक्रेनकडून केला जात आहे. UN च्या स्थलांतरित आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक सहा लोकांपैकी एक व्यक्ती युद्धामुळं विस्थापित झाला आहे. संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार, 6.8 दशलक्ष (68 लाख) पेक्षा जास्त लोक इतर देशांमध्ये स्थलांतरीत झाले आहेत.  

जागतिक अर्थव्यवस्थेवरही रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम 

जागतिक अर्थव्यवस्थेवरही रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पश्चिमेकडील आयात कमी झाल्यामुळं यावर्षी अर्थव्यवस्था 8.5 टक्क्यांनी ने कमी होणार आहे. युक्रेनसाठी आतापर्यंत तब्बल 8.3 अब्ज डॉलर (जवळपास 64,405 कोटी) लष्करी आणि जनतेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींवर खर्च केले आहेत. जे त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या एक अष्टमांश इतकी आहे. युद्धामुळं युक्रेनमधील पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. द कीव्ह स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं दिलेल्या अहवालानुसार, युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे नुकसान सुमारे 100 अब्ज डॉलर (7.76 लाख कोटी रुपये) इतकं झालं आहे. फोर्ब्सनं दिलेल्या माहितीनुसार, युद्धामुळं रशियाला तब्बल 13 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
Ratnagiri : रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Embed widget