एक्स्प्लोर

पीएम मोदी - राष्ट्रपती पुतिन यांच्या भेटीदरम्यान सावलीसारखी मागे उभी असणारी 'ती' महिला कोण?

युक्रेन आणि रशियामधील युद्धानंतर पहिल्यांदाच रशियात पोहोचलेले पंतप्रधान मोदी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी शिखर परिषदेत चर्चा करणार आहेत.

PM Modi President Putin Moscow Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून सोमवारी संध्याकाळी ते मॉस्को शहरात पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले.  रशिया युक्रेन युद्धानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान जेंव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले तेंव्हा राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांच्या स्वागतासाठी तिथे आधीच उभे होते. पीएम मोदी कारमधून उतरताच त्यांनी प्रथम हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली आणि त्यांचे घनिष्ठ संबंध व्यक्त केले. मात्र, या संपूर्ण भेटीत एका महिलेने लक् वेधून घेतले. राष्ट्राध्यक्ष पुतीन आण पंतप्रधान मोदी यांच्या मागे सवलीसारखी चालत असणारी ही महिला कोण आहे? पाहूया..

पंतप्रधान मोदी- राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मागे असणारी महिला कोण?

शिखर परिषदेसाठी रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन त्यांच्या मातृभाषेतच बोलणे पसंत करतात. सोमवारी एका खासगी डिनरदरम्यान पंतप्रधान मोंदींसोबतत झालेल्या भेटीत राष्ट्राध्यक्ष पुतिन रशियन भाषेत बोलताना दिसले आणि पंतप्रधान मोदी हिंदीत बोलताना दिसले. अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्यासाठी दोन्ही देशांतून दूभाषकांचे नेमणूक करण्यात येते. ही मागे चालणारी महिला त्यापैकीच एक होती. काळ्या रंगांच्या कपड्यात असलेली ही महिला रशियाकडून नेमण्यात आलेली दुभाषक होती. राष्ट्राध्यक्ष पुतिन काय म्हणताहेत याचा अनुवाद ती करत होती. यावेळी भारताकडून नेमण्यात आलेला दुभाषकही उपस्थित होता.

पंतप्रधानांच्या कामाचे पुतिन यांच्याकडून कौतूक

यावेळी पुतिन यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक बैठकीत राष्ट्रपती पुतिन यांनी भारताच्या प्रगतीसाठी केलेल्या कामाबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते मोदींना म्हणाले, "पुन्हा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मला तुमचे अभिनंदन करायचे आहे. मला वाटतं हा योगायोग नसून तुमच्या अनेक वर्षांच्या कामाचा परिणाम आहे. पंतप्रधान मोदींनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या लोकांसाठी समर्पित केले आहे लोकांनाही ते जाणवू शकते," असेही ते म्हणाले.

शिखर परिषदेत चर्चेसाठी उत्सूक- पंतप्रधान मोदी

दुसरीकडे नोबो ओगार्योवो (रशियन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान ) येथे पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे यजमान पदासाठी आभार व्यक्त केले. एक्स या समाज माध्यमावर त्यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की , "आम्ही उद्याच्या चर्चेची आतुरतेने वाट पाहत आहोत जे रशिया आणि भारतातील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील."

युक्रेन आणि रशियामधील युद्धानंतर पहिल्यांदाच रशियात पोहोचलेले पंतप्रधान मोदी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी शिखर परिषदेत चर्चा करणार आहेत. या भेटीकडे एक व्यापक भूराजकीय संबंध आणि संकेत म्हणून पाहिले जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रमABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Maha Kumbh Stampede News : हा दु:खाचा दिवस, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाल्या...   
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, साध्वी निरंजन ज्योती सरकारकडे मोठी मागणी करत म्हणाल्या, हा दु:खाचा दिवस...
Embed widget