एक्स्प्लोर

देशातून चोरी झालेला सांस्कृतिक वारसा मायदेशी आणणार : मोदी

न्यू यॉर्क : स्वित्झर्लंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.   अमेरिकेचे थिंक टँक मानल्या जाणाऱ्यांशीही मोदी संवाद साधतील. भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजताच्या सुमारास मोदी वॉशिंगटनला पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा हा चौथा दिवस आहे.  

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना

  गेल्या दोन वर्षांत भारतातून चोरी झालेल्या सांस्कृतिक वारशांना पुन्हा मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं मोदींनी स्वित्झर्लंडमध्ये सांगितलं. भारतात काही पुरातन कलाकृती असून त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कलाकृती पाहून आपले पूर्वज विज्ञान आणि कलेच्या क्षेत्रात किती मातब्बर होते, याची जाणीव होत असल्याचं मोदींनी सांगितलं.   हा सर्व खजिना आम्हाला परत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोदींनी बराक ओबामा यांचे आभार मानले. आम्हाला आमच्या भूतकाळाशी नाळ जोडण्यास मदत होईल, असं सांगतानाच सरकार अशा तस्करीविरोधात कठोर कायदा करण्याच्या तयारीत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.  

अफगाणिस्तानातील सलमा धरणाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन

भारताच्या मदतीने अफागाणिस्तानमध्ये बांधण्यात आलेल्या सलमा धरणाचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे बटन दाबून धरणाचं उद्घाटन केलं.     हे धरण बांधण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला 1700 कोटी रुपयांची मदत केली. अफगाणिस्तानच्या विकासात भारताने नेहमीच महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे. हे धरणही त्याचंच उदाहरण मानलं जातं.     यावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांना अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार अमीर अमिनुल्ला खार पुरस्कारानेही गौरवले.     चौथा अमेरिका दौरा, तर दुसरा अफगाणिस्तान दौरा     नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा चौथा अमेरिका दौरा आहे आणि दुसरा अफिगाणिस्तान दौरा आहे. याआधी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget