एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसीय परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या 4 दिवसात मोदी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड या देशांना भेट देणार आहेत.
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून मोदी त्यांना पहिल्यांदाच भेटणार आहेत. या भेटीत दहशतवाद तसंच एच 1 बी व्हिजामध्ये केलेल्या बदलांवर चर्चा करतील.
पंतप्रधान मोदी 26 जूनला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेच्या या दौऱ्यात मोदींचा द्विपक्षीय व्यापारात वाढ आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यावर जोर असेल. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच बैठक असणार आहे.
दरम्यान, अमेरिकेतील काही कंपन्यांचे सीईओ आणि उद्योजक यांना पंतप्रधान मोदी 25 जूनला भेटणार आहेत. यावेळी व्यापार आणि गुंतवणूक यावर त्यांची चर्चा होईल.
चार दिवसीय दौऱ्यात मोदी पहिले पोर्तुगाल, नंतर अमेरिका आणि 27 जूनला नेदरलँडला जाणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement