एक्स्प्लोर

मोदी स्वित्झर्लंडला रवाना, शाहरुख, अंबानी, अदाणीही हजर राहणार

पाच दिवस चालणाऱ्या या 48 व्या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि नागरिकांशी संबंधित अनेकविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आर्थिक मंच अर्थात डब्ल्यूईएफच्या बैठकीसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले आहेत. आज सकाळी 9 वाजता रवाना झालेले मोदी संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान ते दावोसमध्ये दाखल होतील. पाच दिवस चालणाऱ्या या 48 व्या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि नागरिकांशी संबंधित अनेकविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.  ज्यात भारताकडून जवळपास 130 हून अधिकजण प्रतिनिधित्व करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती जगभरातील प्रतिनिधींना देतील. दरम्यान 20 वर्षांनंतर अशा बैठकीला उपस्थिती लावणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1997 मध्ये देवेगौडा यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. सोमवारी मोदी जगभरातल्या कंपन्यांच्या सीईओंसोबत डिनर करणार आहेत, तर मंगळवारी उद्घाटनसत्रात मोदी संबोधित करणार आहेत. याच कार्यक्रमात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा सन्मान केला जाणार आहे. शाहरुखसह ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री केट ब्लेन्चेट आणि संगीतकार एल्टन जॉन यांचाही सन्मान होणार आहे. मोदींसह भारतीय मंत्र्यांचा ताफा या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे मंगळवारी डब्ल्यूईएफच्या आंतरराष्ट्रीय व्यापार समुदायाच्या 120 सदस्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल. मोदींसोबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पियूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, एम जे अकबर आणि जितेंद्र सिंह हे उपस्थित राहणार आहेत. अंबानी, अदाणींसह मोठे उद्योजक या बैठकीला जगभरातील विविध कंपन्यांचे सीईओ हजर राहणार आहेत. भारताकडून रिलायन्सचे मुकेश अंबानी, गौतम अदाणी, अजीम प्रेमजी, राहुल बजाज, एन चंद्रशेखरन, चंदा कोचर, उदय कोटक आणि अजय सिंह हे उपस्थित राहतील. ट्रम समारोप करणार दरम्यान, जागतिक नेत्यांच्या या बैठकीचा समारोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाने होईल. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी हे सुद्ध उपस्थित आहेत. मात्र मोदी आणि त्यांच्यात कोणत्याही बैठकीचं नियोजन नाही. बैठकीला उपस्थित राहणाऱ्या अन्य देशांच्या प्रतिनिधींमध्ये जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल, इटलीचे पंतप्रधान पाउलो गेटिलोअली, फ्रान्सचे अध्यक्ष एमानुएल मॅक्रोन, इंग्लंडचे पंतप्रधआन थेरेसा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेव यांचा समावेश असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावरBeed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali DamaniaSuresh Dhas On Beed Santosh Deshmukh Case : Sudarshan Ghule हा केवळ प्यादं! मुख्य आरोपी 'आका' आहे : Suresh DhasBeed Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Ind vs Aus 5th Test : सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
All Is Well! ऐश्वर्या-अभिषेक एकत्रच, न्यू एयर पार्टीनंतर एअरपोर्टवर स्पॉट; VIDEO मुळे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम
All Is Well! ऐश्वर्या-अभिषेक एकत्रच, न्यू एयर पार्टीनंतर एअरपोर्टवर स्पॉट; VIDEO मुळे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
कोहली आऊट झाल्यावर... ; नाना पाटेकरांच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ, पण नेटकरी करतायत मीम्स व्हायरल
कोहली आऊट झाल्यावर... ; नाना पाटेकरांच्या वक्तव्यानं सोशल मीडियात खळबळ, पण नेटकरी करतायत मीम्स व्हायरल
Embed widget