PM Narendra Modi Itali Visit : तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदींचा पहिला दौरा इटलीला, G7 देशांच्या बैठकीवेळी जॉर्जिया मेलोनींची भेट घेणार
PM Narendra Modi Itali Visit : इटलीमध्ये G7 देशांची बैठक 13 ते 15 जून दरम्यान होणार असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे.
![PM Narendra Modi Itali Visit : तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदींचा पहिला दौरा इटलीला, G7 देशांच्या बैठकीवेळी जॉर्जिया मेलोनींची भेट घेणार PM Narendra Modi Visit Italy For G7 Summit First Trip Abroad In 3rd Term pm narendra modi first foreign G7 summit joe biden pm Giorgia Meloni marathi latest news PM Narendra Modi Itali Visit : तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदींचा पहिला दौरा इटलीला, G7 देशांच्या बैठकीवेळी जॉर्जिया मेलोनींची भेट घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/654a4fae5febe214b391fd49f5cef7bb171810865128093_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Narendra Modi First Foreign Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदा कोणत्या देशाचा दौरा करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचं उत्तर आता जवळपास मिळालं असून पंतप्रधान मोदी हे इटलीच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. 13 ते 15 जून दरम्यान इटलीमध्ये जी 7 देशांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी हे इटलीला जाणार असून तिथे विकसित देशांच्या प्रमुखांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. सरकारकडून औपचारिकपणे याची अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही.
रशिया-युक्रेन युद्धावर होणार चर्चा (G7 Countries Meeting On Russia Ukrain Conflict)
इटलीमध्ये G7 देशांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन, फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, जपानचे पंतप्रधान फुमीओ किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित असतील.
जॉर्जिया मेलोनींची घेणार भेट (Narendra Modi To Meet Giorgia Meloni)
या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यामध्ये बैठकही होणार आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की हेदेखील इटलीतील बैठकीला उपस्थित असणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 जून रोजी इटलीसाठी रवाना होणार आहे तर 14 जून रोजी ते मायदेशी परत येतील. नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत एक उच्चस्तरिय समिती असणार आहे. त्यामध्ये नवनियुक्त परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रआ आणि एनएसए अजित डोवाल असतील अशी माहिती आहे.
गेल्या वर्षी नरेंद्र मोदी हे G7 देशांच्या बैठकीसाठी इटलीला गेले होते. त्यावेळी त्यांनी युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली होती.
G7 देशांच्या समितीतल अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली,जर्मनी, कॅनडा आणि जपान या विकसित देशांचा समावेश आहे. इटली हा यंदाच्या बैठकीचा यजमान देश आहे. G7 देशांच्य बैठकीत जगभरातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाते. हा गट आधी G8 असा होता. पण 2014 साली रशियाने क्रिमियावर हल्ला केल्यानंतर त्या देशाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)