Modi Putin Phone Call : पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा, 'या' मुद्द्यांवर झालं बोलणं
Modi Putin Phone Call : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin ) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
Modi Putin Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin ) यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि इतर विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. याबरोबरच पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील सद्यस्थितीशी संबंधित संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचा यावेळी पुनरुच्चार केला.
PM Modi speaks with Russian President Vladimir Putin; reiterates India's position on Ukraine situation, favouring dialogue and diplomacy
— Press Trust of India (@PTI_News) July 1, 2022
डिसेंबर 2021 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात दोन्ही देशांमधील जुने संबंध वाढवण्यासाठी पहिली '2+2' मंत्रीस्तरीय चर्चा झाली. "गेल्या काही दशकांमध्ये जगाने अनेक मूलभूत बदल पाहिले आहेत आणि विविध प्रकारची राजकीय समीकरणे उदयास आली. परंतु भारत आणि रशियामधील मैत्री स्थिर राहिली. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हे आंतरराज्य मैत्रीचे एक अद्वितीय आणि विश्वासार्ह मॉडेल आहे, असे त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, भारत हा काळाची कसोटी पाहणारा मित्र आणि जागतिक महासत्ता आहे. दोन्ही देश एकत्रितपणे भविष्याकडे पाहत आहेत. आपण भारताकडे एक महान शक्ती, एक मैत्रीपूर्ण राष्ट्र म्हणून पाहतो. आपल्या देशांमधील संबंध वाढत आहेत. ऊर्जा क्षेत्र, नावीन्य, अंतराळ आणि कोरोना प्रतिबंधक लस आणि औषधांचे उत्पादन यासारख्या क्षेत्रात विकासाला चालना देण्यासाठी दोन्ही देश भागीदार राहतील.
दरम्यान, या बैठकीपूर्वी भारत आणि रशियाने 2021-31 साठी लष्करी-तांत्रिक सहकार्य व्यवस्थेअंतर्गत इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत 600,000 AK-203 असॉल्ट रायफल्सच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली होती.
महत्वाच्या बातम्या