(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Egypt Visit : पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर, पंतप्रधान मुस्तफा मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर, गार्ड ऑफ ऑनर देऊन केले स्वागत
PM Modi Egypt Visit :अमेरिका दौरा पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्तच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी इजिप्तमध्ये पोहचले आहेत. यावेळी गार्ड ऑफ ऑनर देऊन पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यात आले.
PM Modi Egypt Visit : अमेरिकेतील राजकीय दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे थेट इजिप्तमध्ये पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता इजिप्तच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. इजिप्तचे (Egypt) पंतप्रधान मुस्तफा हे यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहचले. तर यावेळी गार्ड ऑफ ऑनर देऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत इजिप्तमध्ये स्वागत करण्यात आले.
इजिप्तमध्ये दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इजिप्तमधील स्वागताचे फोटो ट्विट केले आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटलं की, 'मला विश्वास आहे की या दौऱ्यामध्ये भाजप आणि इजिप्तचे संबंध आणखी घट्ट होतील. मी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल-सिसी यांच्यासोबत अनेक मुद्द्यावर चर्चा देखील करणार आहे. तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होणार आहे.'
I thank Prime Minister Mostafa Madbouly for the special gesture of welcoming me at the airport. May India-Egypt ties flourish and benefit the people of our nations. pic.twitter.com/XUNHGsVtA2
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मॅडबॉली यांचे देखील यावेळी आभार मानले. दरम्यान इजिप्तच्या काहिरा हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यात आले. ते याच हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. इथे त्यांनी इजिप्तमधील भारतीयांची देखील भेट घेतली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी देखील यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी वंदे मातरम् अशा घोषणा देखील देण्यात आल्या. दरम्यान एका तरुणीने गाणं गाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं.
Egypt: PM Modi arrives at Cairo hotel to rousing welcome from Indian diaspora
— ANI Digital (@ani_digital) June 24, 2023
Read @ANI Story | https://t.co/xnQRpSkelp#PMModi #India #Egypt #IndianDiaspora #Cairo pic.twitter.com/E9xtslTjWA
असा असेल पंतप्रधानांचा इजिप्त दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला इजिप्तचा दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रसिद्ध असलेली पुरातन अल हाकिम मशिदीत सुद्धा जातील. शनिवारी (24 जून) रात्री 9 वाजता ते दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर रात्री 10.10 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी इजितप्तच्या ग्रॅण्ड मुफ्तीसोबत देखील चर्चा करतील. त्यानंतर रात्री 11 नंतर ते इजिप्तच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल-सिसी यांची भेट घेणार आहेत. तर गेल्या 26 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा इजिप्तमधील राजकीय दौरा आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये झालेल्या जी -20 च्या बैठकीत पाकिस्तान, चीन, तुर्की, सौदी अरेबिया या देशांसह इजिप्तने देखील या बैठकीत सहभाग घेतला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे.