एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हणून झिम्बॉब्वेच्या राष्ट्रपतींकडून 'त्या' खेळाडूंची तुरुंगवासात रवानगी
नवी दिल्ली: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगच्या पाठोपाठ झिम्बॉब्वेच्या राष्ट्रपती रॉबर्ट मुगावे यांनीही रिओ ऑलिम्पिकमध्ये एकाही पदकाची कमाई न केलेल्या खेळाडूंची तरुंगात रवानगी केली आहे. रिओ ऑलिम्पिकहून मायदेशी परतलेल्या खेळाडूंना घरापर्यंत पोहचण्या आधीच हरारेच्या विमानतळावर अटक करण्यात आली.
पदक जिंकण्याच्या अपेक्षेने झिम्बॉब्वेचे 31 खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये दाखल झाले होते. पण या 31 खेळाडूंपैकी एकाही खेळाडूला पदकाची कमाई करता आली नाही, याशिवाय त्यांची रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरीही अतिशय निराशाजनक राहिली. झिम्बॉब्वेच्या कोणत्याही खेळाडूला आठव्या स्थानापेक्षा वर मजल मारता आली नाही. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रपतींनी संपूर्ण टीमला उंदराची उपमा दिली.
राष्ट्रपती मुगावेंना टोकाचा राग येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, झिम्बॉब्वेच्या शेजारी देश बोत्स्वानाने त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करून चौथ्या आणि पाचव्या स्थानी धडक मारली.
किम जोमकडून खेळाडूंना कोळशाच्या खाणीत काम
दुसरीकडे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग यांनीही ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकलेल्या खेळाडूंना कोळशाच्या खाणीत काम करण्यास पाठवले. याशिवाय त्या खेळाडूंच्या रेशनमध्येही कपात केली आहे.
उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी 2012 ऑलिम्पिकच्या तुलनेत 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून अधिक पदकांची कमाई करावी, अशी जोंग यांची इच्छा होती. विशेष म्हणजे, जोंग यांनी यासाठी खेळाडूंना रिओ ऑलिम्पिकमध्ये कमीत कमी चार सुवर्ण पदकांची कमाई करण्याचे लक्ष्य दिले होते.
पण रिओमध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूंच्या तुलनेत उत्तर कोरियाच्या खेळाडूंची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली. रिओ ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी एकूण सात पदकांची कमाई केली. यात 2 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तर दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी एकूण 21 पदकांची कमाई केली. यामध्ये 9 सुवर्ण पदकांचा समावेश होता. त्यामुळे जोंग यांच्या रागाचा पारा चढला.
दरम्यान, उत्तर कोरियाची एक पदक विजेती खेळाडू अतिशय घाबरलेली आहे. कारण, उत्तर कोरियमध्ये सेल्फी आणि इतर अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यास बंदी असताना तिने पदकाची कमाई केल्यानंतर सेल्फी काढला होता. त्यामुळे तिला जोंगकडून मृत्यूची शिक्षा सुनावण्याची भिती सतावत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement