Parade of Planets : अवकाशात दिसणार ग्रहांची परेड, पाच ग्रह एकाच रांगेत; जाणून घ्या कारण...
Parade of Planets : आज अवकाशात तुम्हांला ग्रहांची परेड पाहता येणार आहे. या आठवड्यात अवकाशात जणू ग्रहांचं प्रदर्शन भरल्याप्रमाणे ग्रह तुम्हांला उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहेत.
Parade of Planets : आज अवकाशात तुम्हांला ग्रहांची परेड पाहता येणार आहे. या आठवड्यात अवकाशात जणू ग्रहांचं प्रदर्शन भरल्याप्रमाणे ग्रह तुम्हांला उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, गुरू, शनि आणि शुक्र आणि चंद्र आणि त्याचा उपग्रह हे ग्रह एकाच रांगेत येतील. त्यामुळे अवकाशात एकामागोमाग अशी ग्रहांची परेड पाहता येणार आहे. विशेष म्हणजे ही परेड उघड्या डोळ्यांनाही दिसेल. शुक्रवारपासून चंद्राने त्याच्या परिक्रमेला सुरुवात केली. यावेळी चंद्र त्याचा उपग्रह आणि शुक्र एकमेकांच्या जवळ आले. त्यामुळे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान आकाशात तीन ग्रह एकामागे एक रांगेत आल्याचे पाहता आला. त्यानंतर जसजसा आठवड्याचा कालावधी जाईल तसे शनि आणि गुरू या ग्रहांच्या जवळून पुढे जात राहील. त्यामुळे आज 12 डिसेंबरला हे पाचही ग्रह एकाच रांगेत आल्याचं पाहायला मिळेल.
ही ग्रहांची परेड दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येईल. त्यासाठी केवळ मोकळं आकाश असणं गरजेचं आहे. ग्रह आणि चंद्र एकाच रांगेत आलेले पाहण्याची ही उत्तम संधी आहे. या पाच ग्रहांचे एकत्र निरीक्षण करण्यासाठी सर्वोत्तम वेळ 12 डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर असेल, यावेळी शुक्र, शनि, गुरू आणि चंद्र उघड्या डोळ्यांनाही दिसतील.
On Sunday (Dec. 12), five planets, two large asteroids, and the Moon will align in the night sky. Visible around the world. pic.twitter.com/u4Zdm0ob13
— Latest in space (@latestinspace) December 8, 2021
यासह जर तुम्हांला इतर ग्रहसुद्धा पाहायचे असतील, तर त्यासाठी छोट्या दुर्बिणीची आवश्यकता असेल. तुम्हांला दुर्बिणीद्वारे नेपच्यून, युरेनस, सेरेस आणि पॅलास हे ग्रह आणि लघुग्रह सुद्धा पाहता येतील. गेल्या वर्षीही 19 जुलै रोजी पाच ग्रहांचे दर्शन झाले होते. बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि लोकांना दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी दिसत होते.
NASA च्या मते, यावेळी उल्कावर्षावही पाहता येण्याची शक्यता आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये जेमिनिड्स उल्कावर्षाव (Geminids) होतो. त्यामुळे यावेळी मिथुन उल्कावर्षाव आकाशात पसरेल. हा सर्वोत्तम आणि वार्षिक उल्कावर्षावांपैकी एक आहे." वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील खगोलशास्त्र प्राध्यापकांच्या सांगण्यानुसार हा वर्षातील सर्वात मोठा उल्कावर्षाव असेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- आंगणेवाडी यात्रेची तारीख ठरली; 24 फेब्रुवारीला होणार यात्रोत्सव
- Stand-Off Anti-Tank Missile : भारतीय हवाई दलाचा ताफा आणखी बळकट, SANT रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- MHADA Exam Postpone LIVE : म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली! वाचा महत्वाच्या अपडेट्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha