एक्स्प्लोर
गाझामध्ये स्फोट, पॅलेस्टाईनचे पंतप्रधान थोडक्यात बचावले!
वेस्ट वॉटर प्युरिफिकेशन प्लांटच्या उद्घटनासाठी हमदल्ला गाझा पट्टीत गेले होते. तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांची बैठक होती.
गाझा : पॅलेस्टाईनचे पंतप्रधान रामी हमदल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हमदल्ला मंगळवारी गाझा पट्टीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर निशाणा साधत हल्ला केला गेला. सुदैवाने यातून हमदल्ला बचावले.
या स्फोटात सात जण जखमी झाले असल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या गृहमंत्रालयाने दिली.
वेस्ट वॉटर प्युरिफिकेशन प्लांटच्या उद्घटनासाठी हमदल्ला गाझा पट्टीत गेले होते. तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांची बैठक होती.
पॅलेस्टाईन न्यूज एजन्सी वाफाच्या माहितीनुसार, हमदल्ला आणि पॅलेस्टाईन गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख मजीद फराज हे दोघेही हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
दरम्यान, आतापर्यंत कुठल्याच दहशतवादी संघटनेने स्वत:हून या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र पॅलेस्टाईन नॅशनल ऑथोरिटीने 'हमास'ला या स्फोटासाठी जबाबदार धरले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement