Palestine Earthquake: तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के, 4.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर
Palestine Earthquake: तुर्कीपाठोपाठ पॅलेस्टाईनमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजली गेली.
![Palestine Earthquake: तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के, 4.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर Palestine Earthquake shook by strong tremors 4.8 measured intensity turkiye Turkey syria earthquake Palestine Earthquake: तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के, 4.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/026972502f0bc60b0fa3df7c2b3e68751675041136729282_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Palestine Earthquake: तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता पॅलेस्टाईनमध्येही (Palestine) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, पॅलेस्टाईनमधील या भूकंपाचा केंद्रबिंदू नब्लस शहरापासून 13 किमी उत्तरेस होता, ज्याची खोली 10 किमी होती.
पॅलेस्टाईनमध्ये रात्री 11.14 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा बसला. स्थानिक वेळेनुसार आणि वेस्ट बँकमधील एरियलच्या अग्नेय दिशेस सुमारे 15 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र होतं, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, पॅलेस्टाईनसोबतच जेरुसलेम, बीट शेमेश आणि मेवासेरेट झिऑन भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
तुर्की-सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे 6 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून 3 विमानतळं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप अर्दोन यांनी एका निवेदनात म्हटलंय की, जगातील 84 देशांनी आतापर्यंत बचाव कार्यात मदत देऊ केली आहे. राष्ट्रपतींनी मदत करणाऱ्या देशांचे आभारही मानलेत.
आरोग्य कर्मचारी आणि आवश्यक उपकरणांसह 30 खाटांचे फील्ड हॉस्पिटल पाठवून भारतानंही तुर्कीला मदत केलीये. 45 सदस्यांचे वैद्यकीय पथकही भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलंय. तसेच, भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या गाझियानटेपजवळ एनडीआरएफची टीम बचाव कार्यात मदत करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)