वॉशिंग्टन प्रेस क्लबमध्ये पाकिस्तानींचा गोंधळ; काश्मीरमधील बदलाच्या चर्चेदरम्यान गोंधळ
Kashmir's Transformation : इंटरनेटवर फिरत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, एक चिडलेला पाकिस्तानी अधिकारी चर्चेदरम्यान स्पीकरवर ओरडताना दिसत आहे.
Washington Press Club : काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान शांत बसण्यास तयार नाही. वॉशिंग्टन प्रेस क्लबमध्ये काश्मीरमधील बदलाच्या चर्चेमध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी व्यत्यय आणला. त्यानंतर चर्चेतून या पाकिस्तानी अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. वॉशिंग्टन डीसीच्या नॅशनल प्रेस क्लबमध्ये गुरुवारी काश्मीरमधील कायापालटावर झालेल्या चर्चेत पाकिस्तानी लोकांनी व्यत्यय आणला. सध्या याचा व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता असलेल्या एका व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिडलेला पाकिस्तानी अधिकारी चर्चेदरम्यान पॅनल स्पीकरवर ओरडताना दिसत आहे. त्याचवेळी आणखी एक पाकिस्तानी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' अशी घोषणा देत बाहेर जाताना दिसतोय. त्यानंतर पाकिस्तानी अधिकान्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं.
#WATCH | Pakistanis heckle, interrupt discussion on Kashmir’s transformation in Washington DC’s National Press Club pic.twitter.com/I5OHEL6s9I
— ANI (@ANI) March 24, 2023
इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस स्टडीजने (International Center for Peace Studies) 23 मार्च रोजी वॉशिंग्टन, डीसी (Washington, DC) येथील नॅशनल प्रेस क्लब (National Press Club) येथे पॅनेल चर्चेचं आयोजन केलं होतं. काश्मीर - फ्रॉर्म टूरमॉईल टू ट्रान्सफॉर्मेशन : ग्राउंडवरून दृष्टीकोन (Kashmir - From Turmoil to Transformation : Perspectives from the Ground) या विषयावर चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जम्मू-काश्मीर वर्कर्स पार्टीचे (Jammu and Kashmir Workers Party) अध्यक्ष मीर जुनैद (Mir Junaid) आणि जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला नगरपरिषदेचे अध्यक्ष तौसीफ रैना (Tauseef Raina) यांचा समावेश होता.
याच दिवशी, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये (UNHRC - United Nations Human Rights Council) काश्मीरचा मुद्दा उचलून धरल्याबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला खडेबोल सुनावले. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये (UNHRC) मधील अजेंडा आयटम 4 अंतर्गत सर्वसाधारण चर्चेदरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला सुनावताना भारताने म्हटलं की, "आम्ही पाकिस्तानला निरर्थक प्रचारात गुंतण्याऐवजी आणि भारतात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन करतो," परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्थायी सचिव पीआर थुलासीधास (PR Thulasidhass) यांनी हे वक्तव्य केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
वॉशिंग्टन प्रेस क्लबमध्ये पाकिस्तानींचा गोंधळ; काश्मीरमधील बदलाच्या चर्चेदरम्यान गोंधळ