एक्स्प्लोर

मोदी सरकार आलं तर शांततेच्या मार्गाने भारतासोबत चर्चा होऊ शकेल : इम्रान खान

इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी करत मोदी हे नेत्यानाहू यांच्याप्रमाणे भय आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत, असे म्हटले आहे.

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार सत्तेत परत आलं, तर शांततेच्या मार्गाने भारतासोबत चर्चा होऊ शकेल, असा विश्वास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर, काश्मीर प्रश्नावर भारतासोबत बोलणी करणं अशक्य आहे, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना इम्रान खान म्हणाले की,  भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास चर्चेला प्राधान्य दिलं जाईल. काँग्रेस विरोधकांकडून आपण घेरले जाऊ या भीतीने आमच्यासोबत चर्चा करण्यास घाबरेल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.जर भारतात पुढील सरकार काँग्रेसचे आले तर काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ते घाबरतील. मात्र जर भाजपची पुन्हा सत्ता आली तर या मुद्द्यावर निश्चितपणे तोडगा निघू शकतो. इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी करत मोदी हे नेत्यानाहू यांच्याप्रमाणे भय आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत, असे म्हटले आहे. इम्रान खान म्हणाले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या देशभक्तीच्या लाटेचा भाजपला फायदा मिळाला आहे. भारतात लोकसभा निवडणुकांच्या सर्व्हेंमध्ये हे स्पष्ट झाले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारत सरकारने तात्काळ दिलेल्या प्रतिक्रियेचा फायदा मोदी आणि भाजपला मिळाला आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. याउपर या निवडणुकीत जर मोदीविरोधी वातावरण निर्माण झाले असते तर भारताकडून पाकिस्तान विरोधात सैन्यबळाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता होती, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान म्हणाले की, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर उत्तर दिलं नाही तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही, असंही ते म्हणाले. इम्रान यावेळी म्हणाले की, शेजारील अफगाणीस्तान, भारत आणि इराणसोबत शांतता प्रस्थापित करणे हे पाकिस्तानसाठी महत्वाचे आहे. VIDEO | मोदींच्या प्रचार कार्डवर निवडणूक आयोगाचा 'सर्जिकल स्ट्राईक' | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget