एक्स्प्लोर
Advertisement
अमेरिका दौऱ्यात इम्रान खान यांचा अपमान, विमानतळावर स्वागतासाठी कुणीही नाही
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबत तणावपूर्ण बनले आहेत. इम्रान खान यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे.
वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. मात्र वॉशिंग्टनमध्ये ते दाखल झाले, तेव्हा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी अमेरिका सरकारकडून कुणीही आलेलं नव्हतं. त्यामुळे इम्रान खान तेथून मेट्रोनं आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेलवर जावं लागलं.
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर इम्रान खान यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. दौऱ्यात आज डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांची भेट नियोजित आहे. या भेटीत पाकिस्तानमधील सैन्याला मदत कपात करण्याचा मुद्दा, दहशतवादाविरोधातील लढाई आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षिय चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि अफगान तालिबन यांच्यामधील चर्चा एका निर्णयक टप्प्यावर पोहोचली आहे, त्यावेळी इम्रान खान यांना दौरा होत असल्याने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबध तणावपूर्ण बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
इम्रान खान यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे. इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जरल फैज हमीद देखील आहेत.
VIDEO | पाकिस्तान नमलं, हाफिजच्या दोन संघटनांवर बंदी घातली | स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement