पाकिस्तानमध्ये नवरदेवाला आहेरात चक्क एके 47 रायफल; व्हिडिओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला नवरदेवाला एके-47 रायफल देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचे सांगितले जात आहे.
नवविवाहित जोडप्यासाठी भेटवस्तू काय द्यावी असा अनेकांना प्रश्न पडतो. आपली भेटवस्तू दोघांच्या आयुष्यभर स्मरणात राहिल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. पण लग्नाच्या वेळी एखाद्याला एके-47 भेट म्हणून दिली असल्याचे कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का? पण पाकिस्तानमधील एका लग्नात असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला नवरदेवाला एके-47 रायफल देताना दिसत आहे. ही भेट देताना उपस्थित वऱ्हाडी मोठमोठ्याने ओरडत प्रत्साहन देताना दिसत आहे. नवरदेवही हातात रायफल घेऊन वर पोज देताना दिसत आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही यूजर्स कमेंटवरुन आपला राग व्यक्त करत आहेत. सर्वात आश्चर्य म्हणजे एके-47 पाहून वर किंवा वधू दोघांनाही धक्का बसला नाही.
Kalashnikov rifle as a wedding present pic.twitter.com/BTTYng5cQL
— Adeel Ahsan (@syedadeelahsan) November 25, 2020
हा व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार आदिल अहसन यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. ती महिला पहिल्यांदा वराच्या कपाळावर चुंबन घेते आणि नंतर त्याला भेटवस्तूमध्ये एक रायफल देते. व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि 2 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. आरिफ नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की लग्नात अशी भेटवस्तू देणे खरोखर आश्चर्यकारक आहे.