Pakistan : इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशराची मैत्रीण 90 हजार डॉलर घेऊन परदेशात फरार, विमानातील फोटो व्हायरल
Pakistan News : जर पाकिस्तानात नवे सरकार स्थापन झाले, तर तिला अटक होऊ शकते
Pakistan News : पाकिस्तानचे इम्रान खान (Imran Khan) यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी (Bushara bibi) यांची जवळची मैत्रीण फराह खान देश सोडून परदेशात पळून गेली आहे. जर पाकिस्तानात नवे सरकार स्थापन झाले, तर तिला अटक होऊ शकते, अशा बातम्याही येत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे फराह खान पाकिस्तानातून जवळपास 90 हजार डॉलर घेऊन पळून गेली आहे. त्यांचा विमानात बसलेला एक फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे.
फराहने इम्रान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून भ्रष्टाचार केला
पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या उपाध्यक्षा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी दावा केला आहे की, फराहने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून हा भ्रष्टाचार केला आहे. मरियमच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांची "चोरी" पकडली जाईल अशी भीती त्यांना वाटते.
बदल्या आणि पोस्टिंगद्वारे कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप
पंजाबचे नुकतेच बडतर्फ करण्यात आलेले राज्यपाल चौधरी सरवर आणि इम्रान खान यांचे जुने मित्र तसेच पक्षाचे फायनान्सर अलीम खान यांनीही आरोप केलेत की, फराहने पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्यामार्फत बदल्या आणि पोस्टिंगद्वारे कोट्यवधी रुपये कमावले आहेत. तसेच इम्रान खानचे आणखी जवळचे सहकारी देश सोडून जाण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
पाकिस्तानची संसद बरखास्त केली
नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने इमरान खान यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला, त्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याचा सल्ला दिला, ज्यानंतर राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी रविवारी संसद बरखास्त केली.
संबंधित बातम्या