एक्स्प्लोर
पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका
अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केला आहे. शिवाय, पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ असल्याचंही म्हटलं आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केला आहे. शिवाय, पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ असल्याचंही म्हटलं आहे.
पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांना कायमच मदत करत आला आहे, या भारताच्या दाव्याला अमेरिकेने अप्रत्यक्षरित्या दुजोराच दिला आहे.
भारत कायमच सांगत आला आहे की, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मदत पुरवली जाते. अखेर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत समाविष्ट करुन भारताच्या दाव्याचं एकप्रकारे समर्थनच केले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा एका महिन्यापूर्वीच अहवाल आला होता. यामध्ये पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय दिलं जात असल्याचं नमूद करण्यात आले होते.
पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत टाकण्याची या अहवालात शिफारस करण्यात आली होती. अखेर या यादीत टाकण्याचं पाऊल अमेरिकेने उचललं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement