एक्स्प्लोर
खिशात दमडी नसताना पाकिस्तानच्या युद्धाच्या वल्गना, पाकचा कंगालिस्तान
युद्धजन्य परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेलं परदेशी चलन पाकिस्तानकडे अपुरं आहे. पाकिस्तानकडे उपलब्ध परदेशी चलन फक्त सहा दिवस पुरेसं पडू शकतं.
मुंबई : जगाला दहशतवादी कारवायांनी त्रस्त करणारा पाकिस्तान स्वत: कंगालीस्तान झाला आहे. आज जर युद्धाची परिस्थिती उद्भवलीच, तर पाकिस्तानकडे परदेशी चलनच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.
युद्धजन्य परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेलं परदेशी चलन पाकिस्तानकडे अपुरं आहे. पाकिस्तानकडे उपलब्ध परदेशी चलन फक्त सहा दिवस पुरेसं पडू शकतं. तर सामान्य परिस्थितीत ते व्यापारासाठी कसाबसा दीड महिना खेचू शकतात.
भारताशी दोन हात करण्याच्या वल्गना करणाऱ्या कंगालीस्तानने भारताच्या परदेशी गंगाजळीशी तुलना करुच नये.
कंगालीस्तानशी तुलना करावी तरी कशी?
भारत पाकिस्तान
सोने 558 टन 65 टन
परदेशी चलन 40 हजार कोटी डॉलर्स 700 कोटी डॉलर्स
परदेशी कर्ज 53 हजार कोटी डॉलर्स 30 लाख कोटी डॉलर्स
महागाईचा दर 2.49 टक्के 4.78 टक्के
संरक्षण खर्च 3.18 लाख कोटी 1.1 लाख कोटी
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अरेरावीची भाषा करणारा पाकिस्तान नरमला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधा इम्रान खान यांनी भारतासमोर सपशेल लोटांगण घातलं आहे. भेदरलेल्या इम्रान खान यांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
युद्ध केल्यास कोणाचंच भलं होणार नाही, जर तुम्हाला दहशतवादावर चर्चा अपेक्षित असेल, तर आम्ही तयार आहोत. समजूतदारपणे मार्ग काढायला हवा. भारतीय सैन्याने आज सकाळी जम्मू काश्मिरच्या नौशेरातील लाम व्हॅलीमध्ये एक पाकिस्तानी विमान पाडलं, असंही इम्रान खान म्हणाले.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी जम्मू काश्मिरच्या भागात घुसखोरी करुन बॉम्ब हल्ले केले. मात्र या हल्ल्यात काहीही नुकसान झालं नाही. पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानाला भारतीय वायुसेनेने नौशेराच्या लाम वॅलीमध्ये पाडलं, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याआधी दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement