Pakistan Inflation : पाकिस्तानमध्ये पावसाचा कहर, टोमॅटो 500 रुपये किलो, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा
Pakistan Flood : पाकिस्तनमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
Pakistan Flood : भारताच्या शेजारील देश पाकिस्तान (Pakistan) सध्या भीषण संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये अस्मानी संकट (Flood in Pakistan) कोसळलं असून यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. परिणामी महागाई वाढली आहे. टोमॅटोचा दर 500 रुपये किलोवर पोहोचला आहे. पाकिस्तानातील सिंध, लाहौर आणि पंजाब प्रांताला महापुराचा मोठा फटका बसला आहे. येथील 70 टक्के भागात पाणी साचलं असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. महापुराने आतापर्यंत हजारहून अधिक नागरिक आणि लाखो जनावरांचा बळी घेतला असल्याचं पाकिस्तानी मीडियानं म्हटलं आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी येथे महागाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
टोमॅटो 100 रुपये किलो
महापुरामुळे येथे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. आगामी काळात अन्नपदार्थांचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. सध्या फळ आणि भाज्यांचे भाव वाढले आहेत. रविवारी लाहोर बाजारात टोमॅटोचा दर 500 रुपये प्रतिकिलो आहे. तर कांदा 400 रुपये प्रतिकिलो आहे. तर भाज्यांचा दर 100 रुपये प्रतिकिलो आहे. आगामी काळात हे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
भाज्यांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता
पाकिस्तानमध्ये सध्या मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिणामी लाखो कुटुंबांचा संसार उदध्वस्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामध्ये पिकं वाहून गेली आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी येत्या काळात भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. टोमॅटोचा दर 700 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ (टक्क्यांमध्ये)
- टोमॅटो : 43.09 टक्के
- कांदा : 41.13 टक्के
- बटाटा : 6.32 टक्के
- अंडी : 3.43 टक्के
- चूर्ण दूध : 1.53 टक्के
- सिगारेट : 2.26 टक्के
- एलपीजी गॅस : 1.95 टक्के
भाज्यांचे दर
- टोमॅटो : 500 रुपये किलो
- कांदा : 400 रुपये प्रति किलो
- बटाटा : 120 रुपये प्रति किलो
महापुरामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या पुरामुळे आतापर्यंत लहान मुलांसह 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. महापुरामध्ये माणसांसह शेकडो जनावरांनीही आपला जीव गमावला आहे. पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानला महापुरामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानला 4 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झालं आहे.
हजारहून अधिक जणांचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये यंदा विक्रमी पाऊस बरसला असून त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पाकिस्तानमधील 110 जिल्ह्यात पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. या पुरात एक हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे.