एक्स्प्लोर
Advertisement
भारताचा विजय, कुलभूषण जाधवांची फाशी तूर्तास रोखली
हेग (नेदरलॅण्ड्स) : आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. "महाराष्ट्राचे नागरिक कुलभूषण जाधव हे हेर असल्याच्या पाकिस्तानच्या म्हणण्याला ठोस पाठबळ नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना अंतिम निर्णयापर्यंत फाशी दिली जाऊ नये", असं आंतरराष्ट्रीय कोर्टाने ठणकावून सांगितलं.
इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला.
व्हिएन्ना कराराचा दाखला देत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.
आंतराराष्ट्रीय न्यायालयातील 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने, पाकिस्तानी जेलमध्ये बंद असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या अटकेबाबत अद्याप विवाद असल्याचं मान्य केलं.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.
कोर्टाची पाकिस्तानला चपराक
कोर्टाने पाकिस्तानला ठणकावत न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.
"कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं दोन्ही देशांना मान्य आहे. मात्र ते हेर असल्याचे ठोस पुरावे नाहीत. पाकिस्तानच्या पुराव्यांवरुन कुलभूषण जाधव हे हेर किंवा स्पाय असल्याचं सिद्ध होत नाही. तसंच हा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या कार्यकक्षेत येत नाही, हे पाकचं म्हणणं चुकीचं असून, थेट फाशी देता येईल हे पाकिस्तान ठरवू शकत नाही", असं कोर्ट म्हणालं.
राजदूतांना का भेटू दिलं नाही?
या सुनावणीदरम्यान कोर्टाने भारताच्या मागणीचा उल्लेख करुन, भारतीय राजदूतांना कुलभूषण जाधव यांना का भेटू दिलं नाही, असा सवाल पाकिस्तानला केला. कोणत्याही परिस्थितीत परदेशी नागरिकाला राजनैतिक मदत मिळायलाच हवी, असं कोर्ट म्हणालं.
1977 च्या व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळायला हवी होती. कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे. कुलभूषण जाधव यांना भेटू देण्याची मागणी पाकिस्तानने पूर्ण करणं आवश्यक होतं, असं कोर्टाने नमूद केलं.
आंतरराष्ट्रीय कोर्टाने काय म्हटलं?
- पंतप्रधानांची सुषमा स्वराज यांच्याशी बातचीत, कोर्टाच्या आदेशावर समाधान, हरिश साळवे यांच्या कष्टाचंही मोदींकडून कौतुक
- कोट्यवधी भारतीय आणि सत्याचा विजय, भारतीय सरकारचे अभिनंदन, सरबजित सिंह यांची बहीण दलबीर कौर यांची प्रतिक्रिया
- कोर्टाच्या आदेशामुळे
#कुलभूषणजाधव यांच्या कुटुंबीयांना आणि भारतीयांना मोठा दिलासा, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रतिक्रिया - अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही : आंतरराष्ट्रीय कोर्ट
- कुलभूषण जाधव हेर आहेत की नाही हे सिद्ध झालं नाही, कुलभूषण यांनी हेरगिरी केली हा पाकचा दावा टिकणारा नाही : आंतरराष्ट्रीय कोर्ट
- कुलभूषण जाधव हे हेर असल्याचे अद्याप अस्पष्ट, पाकचे पुरावे पुरेसे नाहीत - आंंतरराष्ट्रीय कोर्ट
- 1977 च्या व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळायला हवी होती - कोर्टाचा पाकला झटका
- कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं दोन्ही देशांकडून मान्य : आंंतरराष्ट्रीय कोर्ट
- कुलभूषण जाधव यांना भेटू देण्याची मागणी पाकिस्तानने पूर्ण करणं आवश्यक होतं -आंंतरराष्ट्रीय कोर्ट
- कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळायला हवी : आंंतरराष्ट्रीय कोर्ट
- कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे : आंंतरराष्ट्रीय कोर्ट
- भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली : आंंतरराष्ट्रीय कोर्ट
- पाकने कुलभूषण जाधवांवर हेरगिरीचा आरोप केला आहे, तर भारताने जाधवांना भेटू न दिल्याचा दावा केला आहे : कोर्ट
- भारताकडून कुलभूषण जाधवांच्या फाशीच्या शिक्षेला वारंवार विरोध : आंंतरराष्ट्रीय कोर्ट
- कुलभूषण जाधव फाशीप्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement