पाक-अफगाणिस्तान संघर्ष पेटला! 200 तालिबानी दहशतवादी मारल्याचा पाकिस्तानचा दावा, तर 25 चौक्या ताब्यात घेतल्याचा अफगाणिस्तानचा दावा
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चांगलाच संघर्ष पेटल्याचं चित्र पाहा.यला मिळत आहे. काल रात्री सीमेवर या दोन्ही देशांच्या सैनिकांमधये भीषण चकमक झाली आहे.
Pakistan-Afghanistan clash : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चांगलाच संघर्ष पेटल्याचं चित्र पाहा.यला मिळत आहे. काल रात्री सीमेवर या दोन्ही देशांच्या सैनिकांमधये भीषण चकमक झाली आहे. ज्यामुळं दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानने 200 हून अधिक अफगाण तालिबानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे, तर 23 पाकिस्तानी सैनिकही मारले गेले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानने 58 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचे आणि 25 पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे.
सौदी अरेबिया आणि कतारने हस्तक्षेप केल्यानंतर कारवाई थांबवण्यात आली
अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 12 वाजता सौदी अरेबिया आणि कतारने हस्तक्षेप केल्यानंतर पाकिस्तानविरुद्धची कारवाई थांबवण्यात आली. तेसर्व अफगाणिस्तानच्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि बेकायदेशीर कारवाया मोठ्या प्रमाणात थांबवण्यात आल्या आहेत.
25 पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा अफगाणिस्तानचा दावा
मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की अफगाण सैन्याने 25पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, अफगाण अधिकाऱ्यांनी पाकिस्तानवर राजधानी काबूल आणि देशाच्या पूर्वेकडील बाजारपेठेत बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला होता, जरी पाकिस्तानने या घटना मान्य केल्या नाहीत.
आम्हाला शांतता हवी, परंतु गरज पडल्यास आमच्याकडे पर्याय
भारताच्या दौऱ्यावर असलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी म्हणाले की, अफगाणिस्तानला या प्रदेशात शांतता हवी आहे. आमचे दरवाजे चर्चेसाठी खुले आहेत. आम्ही अफगाणिस्तानात शांतता आणली आहे आणि संपूर्ण प्रदेशात शांततेसाठी प्रयत्नशील आहोत. आम्हाला परिस्थितीचा शांततापूर्ण तोडगा हवा आहे, परंतु जर शांतता प्रयत्न यशस्वी झाले नाहीत तर आमच्याकडे इतर पर्याय आहेत.
पाकिस्तानने 19 अफगाण चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा
पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, पाकिस्तानने 19 अफगाण लष्करी चौक्या आणि "दहशतवाद्यांचे अड्डे" ताब्यात घेतले आहेत. पाकिस्तानने या हल्ल्यांचे वर्णन "अफगाण सैन्याने केलेल्या विनाकारण केलेल्या कृती" असे केले आहे. मुत्ताकीने पाकिस्तानला आपल्या देशात वाढत्या अतिरेकी समस्येवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी दावा केला की
























