Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचं सर्वात मोठं यश, कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवादी रौफ असगरचा खात्मा!
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जैशचा मोरक्या मसूद हजरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा (Rauf Asghar) खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जैशचा मोरक्या मसूद अझहरचा (Masood Azhar) दहशतवादी भाऊ रौफ असगरचा (Rauf Asghar) खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात अजगर गंभीर रित्या जखमी झाला होता. दरम्यान 1999 सालच्या कंधार विमान अपहरणात रौफ असगरचा प्रामुख्याने सहभाग होता. ऑपरेशन सिंदूरच्या सर्जिकल स्ट्राइक हल्ल्यात तो गंभीरित्या जखमी झाला होता. त्यामुळे भारतीय सैन्यांना राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताला एक मोठं यश हाती आलं असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे मौलाना मसूद अझर यांच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाल्याने जैश ही दहशतवादी संघटना पूर्णतः बिथरली होती. अशातच जैशचा मोरक्या मसूद असगरचा दहशतवादी भाऊ रौफ अजगरचा खात्मा झाल्याने दहशतवाद्यांना आणि दहशतवाद पोसणाऱ्यांना एक फार मोठा धक्का बसला आहे. मुरिदकेमध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात तो काल जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान भारतीय वायुदलाना एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर सटीक वार करत शंभरहून अधिक दहशतवादी ठार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता जैशचा मोरक्या मसूद अजगर दहशतवादी भाऊ आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड रौफ अजगरचा खात्मा झाल्याने भारतीय सैन्य दलाला मोठे यश मिळाले आहे.
निष्पापांचा बळी घेणाऱ्या मसूदच्या अख्ख्या कुटुंबाचा खात्मा!
भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा गुन्हेगार दहशतवादी मसूद अझहरचंही (Masood Azhar) कंबरडं मोडलं. मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा केला. निष्पापांचा बळी घेणाऱ्या मसूदच्या कुटुंबावरच हिशेब देण्याची वेळ आल्यानं अझहर हादरून गेला आहे. अशातच कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांसह या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला होता. रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश होता. तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाला. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. आयसी-814 अपहरण करण्यात रौफ असगरची महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर, अल-कायदाचा प्रमुख कार्यकर्ता उमर सईद शेख याला सोडण्यास भाग पाडण्यात आले होतं.अशातच ऑपरेशन सिंदूरमध्ये जखमी झालेल्या रौफ असगरचा ही आता खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.
कंदाहार विमान अपहरणातील मास्टरमाईंड
राऊफ असगरने भारतीय एअरलाइन्सच्या IC-814 विमानाच्या अपहरणाची योजना आखली होती. या अपहरणामुळे भारत सरकारला मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद झरगर यांना सोडावे लागले. कंदाहार विमान अपहरण प्रकरण, ज्याला IC-814 अपहरण म्हणूनही ओळखले जाते, हे भारताच्या नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त घटना आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी, इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट IC-814 या एअरबस A300 विमानाचे अपहरण करण्यात आले. हे विमान नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीकडे निघाले होते. भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुमारे 40 मिनिटांनी, पाच हिजबुल मुजाहिदीनच्या (Harkat-ul-Mujahideen) दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले.
विमानात 179 प्रवासी आणि 11 कर्मचारी होते. अपहरणकर्त्यांनी विमानाला अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे उतरवले. दुबईमध्ये त्यांनी 27 प्रवाशांना सोडले आणि एका प्रवाशाची हत्या केली. शेवटी, विमान अफगाणिस्तानमधील तालिबान-नियंत्रित कंदाहार येथे उतरवण्यात आले. अपहरणकर्त्यांनी भारत सरकारकडे तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी केली. यानंतर मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख, मुश्ताक अहमद झरगर या तिघांची सुटका 31 डिसेंबर 1999 रोजी करण्यात आली, ज्यामुळे अपहरण समाप्त झाले.
हे ही वाचा























