ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भारतावर परमाणू हल्ला करण्याच्या तयारीत? शहाबाज शरीफ यांनी दिलं उत्तर म्हणाले...
या ऑपरेशन अंतर्गत 7 मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्य तळाचाही समावेश होता.

Shehbaz Sharif on Pakistan Nuclear Attack: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासोबत झालेल्या अलीकडील सैन्य तणावादरम्यान परमाणु युद्धाची शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानचा परमाणु कार्यक्रम हा हल्ल्यासाठी नाही, तर शांततेसाठी आणि आत्मसंरक्षणासाठी आहे. शनिवारी इस्लामाबादमध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना शरीफ म्हणाले, "आमचा परमाणु कार्यक्रम केवळ देशाच्या सुरक्षेसाठी आहे, हल्ला करण्यासाठी नाही. त्यामुळे याला आक्रमकता समजणं चुकीचं आहे." त्यांनी दावा केला की भारतीय हल्ल्यांमध्ये 55 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला, पण पाकिस्ताननेही जोरदार प्रत्युत्तर दिलं.
भारताचं 'ऑपरेशन सिंदूर'
शहबाज शरीफ यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे, जेव्हा भारताने 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिक मारले गेले होते, आणि जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित गटाने घेतली होती. या ऑपरेशन अंतर्गत 7 मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्य तळाचाही समावेश होता.
सेना प्रमुख मुनीर राष्ट्रपती होणार? अफवा फेटाळल्या
शहबाज शरीफ यांनी त्या अफवाही फेटाळल्या. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना हटवून लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना राष्ट्रपती बनवण्याचा कोणताही प्लॅन आहे. शुक्रवारी The News या वृत्तपत्राशी बोलताना शरीफ म्हणाले, "आसिम मुनीर यांनी कधीही राष्ट्रपती होण्याची इच्छा व्यक्त केली नाही, आणि अशा कोणत्याही योजना नाहीत. या सगळ्या अफवा आहेत." त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्या, राष्ट्रपती झरदारी यांचं आणि मुनीर यांचं नातं विश्वासावर आधारित आहे.
"दुष्प्रचारामागे विदेशी हात"-गृहमंत्री नकवी
दरम्यान, गुरुवारी गृहमंत्री मोसिन नकवी यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत झरदारी, शरीफ आणि मुनीर यांच्याविरोधात सुरू असलेल्या दुष्प्रचार मोहिमेचा निषेध केला. त्यांनी लिहिलं, "या खोट्या प्रचारामागे कोण आहे, याची आम्हाला कल्पना आहे." त्यांनी असंही नमूद केलं की "परदेशी शत्रू एजन्सींसोबत मिळून हे लोक काहीही प्रयत्न करत असले, तरी आम्ही पाकिस्तान मजबूत करण्यासाठी जे आवश्यक असेल ते करणार. इंशाअल्लाह." फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची 2022 मध्ये 3 वर्षांसाठी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर सरकारने त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवला आहे.
हेही वाचा:
Donald Trump : यूरोपियन यूनियन आणि मेक्सिकोवर टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लेटर जारी























