एक्स्प्लोर
'ऑपरेशन संकटमोचन' : द. सुदानमध्ये अडकलेले 156 भारतीय मायदेशी परतले
नवी दिल्ली : दक्षिण सुदानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरु केलेल्या 'ऑपरेशन संकटमोचन'चा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. दक्षिण सुदामधून 156 भारतीयांना घेऊन हवाईदलाचं C-17 हे विमान आज पहाटे पाच वाजता तिरुअनंतपुरममध्ये दाखल झालं. त्यानंतर तिथून सकाळी 10 वाजता दिल्लीला पोहोचलं.
सुदानमध्ये 600 भारतीय अडकले
दक्षिण सुदानमधील गृहयुद्धात 600 भारतीय अडकले आहेत. त्यापैकी 450 जण राजधानी जुबामध्ये आहेत. मात्र या 600 पैकी केवळ 300 भारतीयांना मायदेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार 156 नागरिक हवाईदलाच्या विमानाने परतले आहेत.
संबंधित बातमी : ऑपरेशन संकटमोचन : सुदानमधील भारतीयांना एअरलिफ्ट करणार
हिंसेचं कारण
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या गटातील संघर्षामुळे सुदानला अंतर्गत यादवीने पछाडलं आहे. यामध्ये 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी सोमवारीच युद्धविरामची घोषणा केली होती.
व्ही के सिंहांनी ऑपरेशन संकटमोचनचं नेतृत्त्व केलं
पराराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह यांनी ऑपरेशन संकटमोचनचं नेतृत्त्व केलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाची तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्वत: सिंह सुदानमध्ये गेले होते. याशिवाय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या देखरेखीखाली हे ऑपरेशन सुरु असल्याचं प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितलं. तसंच दक्षिण सुदानमधील परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी स्वराज यांनी उत्तस्तरीय समितीची स्थापना केल्याची माहितीही स्वरुप यांनी
संबंधित बातमी : सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवा, अक्षयचं ट्वीट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement