(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Variant Update World : ओमायक्रॉनचा कहर! ब्रिटनमध्ये 24 तासांत 12 हजार रुग्ण, तर इस्त्राईलमध्ये कोरोनाची पाचवी लाट
Omicron Variant Update World : जगभरात ओमायक्रॉननं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये 24 तासांत 12 हजार रुग्ण आहेत, तर इस्त्राईलमध्ये कोरोनाची पाचवी लाट आली आहे.
Omicron Variant Update World : दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं सर्वांचीच धाकधुक वाढवली आहे. ब्रिटनमध्ये तर सध्या कोरोनासोबतच ओमायक्रॉन हातपाय पसरताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये एका दिवसात ओमायक्रॉनच्या 12 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर इस्त्राईलमध्ये कोरोनाची पाचवी लाट आली आहे. पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.
यूके हेल्थ सिक्योरिटी एजंसी (UKHSA) ने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये रविवारी कोरोनाचे 82,886 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 12,133 रुग्ण ओमायक्रॉनचे होते. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 37,101 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे, ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाबाधितांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये शुक्रवारी 93,045, तर शनिवारी 90,418 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
ब्रिटेनचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांचं म्हणणं आहे की, "नवा व्हेरियंट अत्यंत वेगानं पसरत आहे. त्यांनी शंका व्यक्त केली आहे की, ओमायक्रॉन बाधितांचा आकडा आणखी जास्त असू शकतो. त्यांचं म्हणणं आहे की, ओमायक्रॉनचे सध्या जितके रुग्ण आढळून येत आहेत. त्यांची संख्या याहून अधिक असू शकते. कारण अद्याप अनेक लोक असे आहेत, ज्यांनी टेस्ट केलेल्या नाहीत."
सध्या अमेरिकेतील टॉप एक्सपर्ट डॉ. एंथनी फाउची (Dr Anthony Fauci) म्हणाले की, "ओमायक्रॉन व्हेरियंट वेगानं पसरतो. एनबीसी न्यूजशी बोलताना डॉ. एंथनी फाउची यांनी शंका व्यक्त करताना म्हटलं की, येत्या काळात आणखी जास्त ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे रुग्ण दिसून येतात. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या व्यक्ती बुस्टर डोस घेतात आणि काळजी घेत आहेत, त्यांना मात्र धोका कमी आहे."
इस्त्राईलमध्ये कोरोनाची पाचवी लाट
ओमायक्रॉनचा शिरकाव होताच इस्त्राईलमध्ये कोरोनाची पाचवी लाट आली आहे. पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी लोकांना लस घेण्याचं आणि सावध राहण्याचं आवाहन केलं. रविवारी देशाला संबोधित करताना ते म्हणाले की, ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त नसले तरी हा अत्यंत वेगानं पसरणारा व्हेरियंट आहे. केवळ दोन ते तीन दिवसांतच याचे रुग्ण दुप्पट होत आहेत. त्यांनी म्हटलंय की, इस्त्राइलमध्ये कोरोनाची 5वी लाट आली आहे.
देशात दोन नवे ओमायक्रॉनग्रस्त, रुग्णांचा आकडा 159वर
देशातील ओमायक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत दोन नवे ओमायक्रॉन ग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. आता दिल्लीतील ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 24 झाली आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, 24 रुग्णांपैकी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत भारतात ओमायक्रॉनची 150 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.
देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 159 वर
राज्यात आज दिल्लीत दोन नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. रविवारी आठ नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली होती. यामध्ये 45 वर्षीय अनिवासी भारतीय आणि नुकताच ब्रिटनमधून गुजरातला परतलेल्या किशोरवयीन मुलाचा समावेश आहे. नवीन रुग्णांमधील गुजरातमधील एकूण रुग्णांची संख्या 15 झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Omicron : सावधान! देशात दोन नवे ओमायक्रॉनग्रस्त, रुग्णांचा आकडा 159वर, आरोग्य मंत्रालयाचं काळजी घेण्याचं आवाहन
- Omicron : धोक्याची घंटा! संकटाचा सामना करण्यास तयार राहा - AIIMS संचालक रणदीप गुलेरिया
- खड्ड्यांची माहिती देणारं सरकारी अॅप; रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नेव्हिगेशन अॅप लाँच
- The Kashmir Files : 'द काश्मीर फाईल्स'चे पोस्टर प्रदर्शित, काश्मिरी पंडितांच्या संघर्षाची कहाणी