Omicron : फायझर लसीपासून तयार झालेल्या अँटीबॉडीज ओमायक्रॉनवर अधिक प्रभावी : संशोधन
Omicron Variant : कोविड-19 संसर्गातून बरे झालेल्या आणि फायझर लसीच्या दोन डोस घेतलेल्या लोकांच्या शरीरातील अँटीबॉडीज ओमायक्रॉन व्हेरियंटला मोठ्या प्रमाणात प्रतिरोधक आहे, असे अभ्यासात समोर आले आहे.
Omicron Variant : कोविड-19 (COVID19) संसर्गातून बरे झालेल्या आणि फायझर (Pfizer) लसीच्या दोन डोससह लसीकरण केलेल्या लोकांच्या शरीरातील अँटीबॉडीज कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटला मोठ्या प्रमाणात प्रतिरोधक आहे, असे एका अभ्यासात समोर आले आहे. सेल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असेही दिसून आले आहे की कोविड-19 वर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक अँटीबॉडीज ओमायक्रॉनच्या विरोधात कुचकामी ठरतील. मात्र, फायझर (Pfizer) लसीचा तिसरा डोस ओमायक्रॉनविरोधात चांगले संरक्षण करू शकते.
ओमायक्रॉन व्हेरियंट आधाच्या कोरोनाच्या प्रकारांच्या तुलनेने वेगाने पसरत असल्याचे दिसत आहे आणि लवकरच जागतिक स्तरावर याचा कहर अधिक वाढेल, असे संशोधकांनी सांगितले. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी अ-धोकादायक विषाणूसारखे कण वापरले जे ओमायक्रॉन स्पाईक प्रोटीन वाहून नेतात आणि विषाणूच्या प्रवेशाच्या विश्लेषणासाठी आणि त्याच्या प्रतिबंधासाठी योग्य आहेत. स्पाइक प्रोटीनचा वापर कोरोना विषाणूद्वारे पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि संक्रमित करण्यासाठी केला जातो.
सध्या, कोविड-19 वर उपचार करण्यासाठी कॅसिरिविमाब (Casirivimab) आणि इमडेविमाब (Imdevimab) आणि एटेसेविमाब (Etesevimab)आणि बामलानिविमाब (Bamlanivimab) या प्रतिपिंडांचे संयोजन वापरले जाते. दरम्यान, संशोधकांनी दर्शविले की हे प्रतिपिंडे ओमायक्रॉन स्पाईकविरूद्ध मोठ्या प्रमाणात कुचकामी आहेत. फक्त एक अँटीबॉडी, सोट्रोविमाब, ओमायक्रॉन विषाणूला प्रतिबंधित करते, असे म्हटलंय.
जर्मन प्राइमेट सेंटरमधील अभ्यासाचे पहिले लेखक मार्कस हॉफमन म्हणाले, “आमच्या सेल कल्चर अभ्यासावरून असा निष्कर्ष निघतो की कोविड-19 वरील उपचारासाठी सध्या उपलब्ध असलेले बहुतेक अँटीबॉडीज ओमायक्रॉनच्या विरोधात कुचकामी ठरतील. सोट्रोविमॅब (Sotrovimab) हा अपवाद आहे आणि ओमायक्रॉन-संक्रमित रूग्णांसाठी एक महत्त्वाचा उपचाराचा पर्याय बनू शकतो," असं हॉफमन यांनी म्हटले आहे.
फायझर लसीच्या दोन डोसनंतर तयार केलेल्या प्रतिपिंडांनी देखील ओमायक्रॉन स्पाईकला इतर प्रकारांच्या स्पाईक प्रोटीनपेक्षा कमी कार्यक्षमतेने प्रतिबंधित केले, असे संशोधकांनी सांगितले.
फायझरच्या तीन डोसनंतर आणि अॅस्ट्राझेनेका आणि फायझर प्रतिबंधकांसह विषम लसीकरणानंतर अधिक चांगला संरक्षणात्मक प्रभाव दिसून आला, असंही त्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : ओमायक्रॉनचा धोका वाढताच, राज्यात सर्वाधिक 125 रुग्ण, जाणून घ्या राज्यनिहाय आकडेवारी
- Viral Video : ब्रिटनमध्ये परेडदरम्यान रॉयल गार्डने चिमुकल्याला पायदळी तुडवले, व्हिडीओ व्हायरल
- Hyundai Tucson भारतात लॉन्च होण्यास सज्ज, 10.25 इंच स्क्रीनसह शक्तिशाली इंजिन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA