Omicron : ओमायक्रॉनच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! ब्रिटनमधील 70 टक्के रुग्ण रुग्णालयात भरती न होता बरे
ब्रिटनच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, इंग्लंड आणि स्कॉटलंड या देशातील रुग्णांचा अभ्यास करुन काही निष्कर्ष समोर आणले आहेत.

मुंबई : जगभर ओमायक्रॉनचा (Omicron) धोका जरी वाढत असला तरी त्या संबंधीच्या अभ्यासातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या या आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची बाधा झालेल्या 50 ते 70 टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज पडली नाही असं ब्रिटनच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. तसेच कोरोना लसीचा बुस्टर डोस घेतल्यानंतर 10 आठवड्यामध्ये ओमायक्रॉनचा धोका टळल्याचं समोर आलं आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी ब्रिटनच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, इंग्लंड आणि स्कॉटलंड या देशातील रुग्णांचा अभ्यास केला.
ब्रिटनमध्ये नोव्हेंबरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत 132 रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तर ओमायक्रॉनची लागण झाल्यापासून 28 दिवसांमध्ये एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांपैकी 50 ते 70 टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज भासली नाही.
ओमायक्रॉनची लागण झाल्यापासून 15 ते 25 टक्के रुग्ण हे 10 आठवड्याच्या आत बरे झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या रुग्णांनी कोरोनाच्या लसीचा बुस्टर डोस घेतला नव्हता.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा उद्रेक
ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी 24 तासांमध्ये एक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. पहिल्यांदाच दैनंदिन आकडा एक लाखाहून अधिक नोंदवण्यात आला. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन वेगाने फैलावत आहे. युरोपीयन देशांपैकी ब्रिटनमध्ये सर्वाधिक प्रमाणात संसर्ग फैलावला आहे. कोरोना महासाथीचा आजार सुरू झाल्यापासून ब्रिटनमध्ये आतापर्यंत एक लाख 47 हजार 573 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 दशलक्षजणांना बाधा झाली आहे.
ब्रिटनमध्ये बुधवारी मागील 24 तासांमध्ये एक लाख सहा हजार 122 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने सरकारने नागरिकांना लशीचा तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 30 दशलक्ष नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 37,101 बाधित आढळले आहेत. या दरम्यान, ब्रिटनने पाच ते 11 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
