Ajit Pawar : नाईट लॉकडाऊनचा वरिष्ठ पातळीवर विचार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
Ajit Pawar On Night Lockdown : विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली.
Ajit Pawar On Night Lockdown : कोरोना नियामांचं देशभरात पालन होत नाही. त्यामुळे कोरोना महामारीच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटनेही देशात शिरकाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. योग्य त्या उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात बोलताना देशात नाईट लॉकडाऊनचा विचार सुरु असल्याची माहिती दिली. गुरुवारी विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणीदेखील यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
ओमायक्रॉनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता देशभरात आता नाईट लॉकडाऊन लावण्याबाबतचा विचार सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज विधानसभेत दिली. तर दुसरीकडे अधिवेशनात आमदार मास्क वापरत नसल्यावरुनही अजितदादा भडकले आणि विधानसभा अध्यक्षांनी अशा सदस्यांना बाहेर काढावं अशी मागणी केली. विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान हे कोरोना संदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. तर येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. त्यामुळे काही गोष्टींचे योग्य वेळी गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे.
अधिवेशनात आमदार मास्क वापरत नसल्यावरुनही अजित पवार चांगलेच भडकले होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी अशा सदस्यांना बाहेर काढावं अशी मागणी केली. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्व आमदारांना मास्क वापराची विनंती करत ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. एखाद्या सदस्याला बोलताना त्रास होत असेल तर आपलं बोलून झाल्यानंतर पुन्हा मास्कचा वापर करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली.