(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओमायक्रॉनचे रुग्ण कमी होत आहेत, पण BA.2 उपप्रकार धोकादायक, WHO ने दिला इशारा
WHO on Omicron : सध्या जगभरातील ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनवर इशारा दिला आहे.
WHO on Omicron : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभराची चिंता वाढवली आहे. भारतातही ओमायक्रॉनने हाहा:कार माजवला. पण सध्या जगभरातील ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनवर इशारा दिला आहे. ओमायक्रॉनचा BA.2 हा उपप्रकार चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले आहे. ओमायक्रॉन BA.2 हा मूळ ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने वाढणारा प्रकार आहे.
ओमायक्रॉनचा BA.2 हा उपप्रकार अधिक वेगाने पसरतो. तसेच यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. प्रयोगशाळामध्ये मिळालेल्या परिणामाची अद्याप स्वतंत्र समीक्षा केलेली नाही. याला सध्या ‘बायोआरएक्सिव’ वर प्रसिद्ध कऱण्यात आले आहे. ओमायक्रॉन BA.2 हा मूळ ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक गंभीर आजाराचे कारण ठरु शकतो, असे अभ्यासात समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) गुरुवारी म्हटले की, BA.1 च्या तुलनेत BA.2 हा अधिक संक्रमक आहे. पण उपप्रकार अधिक धोकादायक नाही. युके आरोग्य सुरक्षा एजन्सी (UKHSA) च्या मते, ओमायक्रॉनचा उपप्रकार BA.2 ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरत आहे. UKHSA चेतावणी दिली आहे की BA.2 मध्ये कोणतेही विशिष्ट उत्परिवर्तन झालेले नाही, ज्यामुळे हा विषाणू डेल्टा प्रकारापासून वेगळे केले जाऊ शकतो.
ओमायक्रॉन व्हेरियंटचे उपप्रकार बीए.1, बीए.2 हे लसीलाही चकवा देऊ शकतात. लसीकरणामुळे तयार झालेल्या रोग प्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता ओमायक्रॉनच्या उपप्रकारत असल्याचे समोर आले आहे, असे टोक्यो विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वात झालेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवाना येथे ओमायक्रॉनचे रुग्ण सर्वात आधी आढळले होते. याचा बीए.1 हा उपप्रकाराने जगभरात हाहा:कार माजवला होता. बीए.1 हा व्हेरियंट जगभरात अतिशय वेगाने पसरत आहे. हा व्हेरियंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटलाही प्रभावहीन करत आहे. नुकताच डेनमार्क आणि ब्रिटनसह अन्य देशात ओमायक्रॉनचा बीए.2 हा उपप्रकार आढळला आहे. बीए.2 हा व्हेरियंट अतिशय वेगाने बीए.1 ला पछाडत आहे. यावरुन से स्पष्ट होतेय की, ओमायक्रॉनच्या मुख्य व्हेरियंटपेक्षा उपप्रकार अतिशय वेगाने पसरत आहेत, असे संशोधनात समोर आले आहे.
संशोधकांनी उंदराला बीए.2 आणि बीए.1 या ओमायक्रॉच्या व्हेरियंटने बाधित केलं. यामध्ये असे समोर आले की, बीए.2 मुळे उंदराची फुफसे खराब झाली. बीए. 1 च्या तुलनेत बीए 2 मुळे अधिक गंभीर आजार असल्याचे यातून स्पष्ट झाल्याचे संशोधकांनी सांगितले.