![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO
WHO about Omicron : कोरोनाचा सध्या ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंट आपल्या सभोवताली असून आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत अधिक वेगात पसरत आहे.
![ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO Omicron infection can increases immunity against Delta but only after vaccination says WHOs scientist soumya swaminathan ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/715e903f11dde6f6d69e5b1efa5a8c2a_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WHO about Omicron : मागील दोन वर्षांपासून कोरोना (Corona) या जागतिक महामारीने जगभरातील नागरिकांना हैराण करुन सोडले आहे. या विषाणूचे एकामागून एक नवे व्हेरियंट येत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि नागरिक त्रासले आहेत. त्यात आता ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने उच्छाद मांडला आहे. पण मागील काही दिवसांपासून हा नवा व्हेरियंट याआधीच्या घातक व्हेरियंच डेल्टाचा प्रसार कमी करु शकतो असं काही अभ्यासातून म्हटलं जात होतं. यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉन जरी डेल्टाचा प्रसार कमी करुन त्याविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढवत असेल, पण यासाठी लसीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. लस घेतली नसल्यास प्रतिकार शक्ती वाढणार नाही असं त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान लसीकरण झालं असल्यास डेल्टा व्हेरियंटची लागण होण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच लसवंत व्यक्तींना ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागणही कमी प्रमाणात होत असून झाल्यास देखील अधिक प्रकृतीवर परिणाम होत नाही. तसंच लवकर बरं होण्यातही मदत होते, असंही अभ्यासातून समोर आल्याने एकदंरीत लस घेणं अनेकरित्या फायद्याचं असून WHO ने देखील हेच आवाहन केले आहे.
संबंधित बातम्या
- Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 39 हजार 207 कोरोनाबाधितांची नोंद तर 53 जणांचा मृत्यू
- Mumbai Corona Update : मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित, तर 12 हजार 810 जण कोरोनामुक्त
- शाळा सुरु करण्याच्या निर्णयासह मुंबईतील रुग्णसंख्या खरचं कमी होतेय का?, पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
- 'मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली, तरी राज्यात धोका कायम, काळजी घेणं अनिवार्य,' टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या सूचना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)