(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित, तर 12 हजार 810 जण कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या कालच्या तुलनेत काहीशी वाढली आहे. सोमवारी 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले होते तर आज ही संख्या 6 हजार 149 झाली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मागील काही दिवसांत मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पण आज मुंबईत कालच्या (सोमवारी) तुलनेत काहीशी रुग्णसंख्या वाढली आहे. सोमवारी 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले होते पण आज मात्र 6 हजार 149 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दिलेले सतर्क राहण्याचे आवाहन पाळणे गरजेचे आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 6 हजार 149 नवे रुग्ण आढळले असून 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 476 झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रुग्ण म्हणजेच 12 हजार 810 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 94 टक्के इतका आहे.
मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
1 जानेवारी | 6347 |
2 जानेवारी | 8063 |
3 जानेवारी | 8082 |
4 जानेवारी | 10860 |
5 जानेवारी | 15166 |
6 जानेवारी | 20181 |
7 जानेवारी | 20971 |
8 जानेवारी | 20,318 |
9 जानेवारी | 19474 |
10 जानेवारी | 13,648 |
11 जानेवारी | 11,647 |
12 जानेवारी | 16,420 |
13 जानेवारी | 13, 702 |
14 जानेवारी | 11, 317 |
15 जानेवारी | 10, 661 |
16 जानेवारी | 7, 895 |
17 जानेवारी | 5, 956 |
18 जानेवारी | 6, 149 |
संबंधित बातम्या
- शाळा सुरु करण्याच्या निर्णयासह मुंबईतील रुग्णसंख्या खरचं कमी होतेय का?, पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
- 'मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली, तरी राज्यात धोका कायम, काळजी घेणं अनिवार्य,' टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या सूचना
- ओमायक्रॉनच्या संकटात 1300 महिलांची सुरक्षित प्रसूती; BMC कडून विशेष दक्षता
TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha