एक्स्प्लोर
सिंगापुरात आज बहुप्रतीक्षित ‘किम-ट्रम्प’ भेट
काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चाही केली होती. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार आहे.

सिंगापूर : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहे. या भेटीसाठी उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. उत्तर कोरियाची अण्वस्त्रसिद्धता या भेटीच्या केंद्रभागी असेल. गेल्या काही महिन्यांपासून अण्वस्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने चालवली आहे. त्यामुळे किम जोंगला संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. तसेच, अमेरिकेने उत्तर कोरियाला कारवाईची धमकीही दिली होती.
काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चाही केली होती. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार आहे. किम जोंग उन काही वेळापूर्वीच एअर चायना 747 ने सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी ते बीजिंगमध्ये गेले आणि तिथून ते विमान बदलून सिंगापूरसाठी रवाना झाले. दरम्यान किम जोंग आपल्या ताफ्यासह सिंगापूरला गेले आहेत. त्यांच्या ताफ्यात 20 हून अधिक गाड्या असल्याची माहिती आहे.Welcomed Chairman Kim Jong Un, who has just arrived in Singapore. pic.twitter.com/ZLK4ouIejx
— Vivian Balakrishnan (@VivianBala) June 10, 2018
दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. सिंगापूरमध्ये पोहोचताच त्यांनी ट्वीट केले की, “Great to be in Singapore, excitement in the air!”. उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांच्या भेटीबद्दलही अशीच उत्सुकता जगभरात आहे. या भेटीत काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.Great to be in Singapore, excitement in the air!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 11, 2018
आणखी वाचा























