एक्स्प्लोर

North Korea: उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीने जपानमध्ये खळबळ; रेल्वे सेवा विस्कळीत, नागरिक भूमिगत

North Korea fires ballistic missile : उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र जपानच्या भूभागावरून गेल्याने खळबळ उडाली. हे क्षेपणास्त्र पॅसिफिक महासागरात कोसळले.

North Korea Fires Ballistic Missile: मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी केली जात आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरियाच्या (North Korea) शेजारचे देश अधिकच सतर्क आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास उत्तर कोरियाने  जपानवरुन (North Korea fires ballistic missile ) क्षेपणास्त्र डागले. यानंतर जपानमध्ये (Japan) धोक्याचा इशारा देणारे अलार्म वाजले. अलार्म वाजल्यानंतर जपानी नागरिकांनी भूमिगत ठिकाणी आसरा घेतला. तर, देशातील उत्तर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली.  

उत्तर कोरियाने मागील 10 दिवसात पाचवे क्षेपणास्त्र डागले. जपानसह दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने पाणबुडीविरोधी सराव केला. त्यानंतर उत्तर कोरियाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. 

उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र पॅसिफिक महासागरात कोळण्यापूर्वी जपानच्या भूभागावरुन गेले. त्यामुळे जपानमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ जारी व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सायरन वाजल्यााचा आवाज ऐकू येत आहे. रस्त्यांवर शुकशुकाट दिसला आहे. जपान सरकारने उत्तर कोरियाच्या या कृत्याचा निषेध केला आहे. 

जपानचे पंतप्रधान किशीदा यांनी या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध करताना म्हटले की, एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आपल्या देशाच्या भूभागावरुन जात पॅसिफिक महासागरात कोसळले. सातत्याने क्षेपणास्त्र डागणे ही एक हिंसक कृती असल्याचे त्यांनी सांगितले. 

जपान सरकारचे प्रवक्ते हिरोकाझू म्हणाले की, "उत्तर कोरियाची कारवाई प्रक्षोभक आहे. उत्तर कोरियाकडून वारंवार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला जात आहे. जपान आणि संपूर्ण पॅसिफिक प्रदेशाच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका आहे. उत्तर कोरियाच्या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे."

जपान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या हवाई हद्दीतून क्षेपणास्त्र गेल्यानंतर सायरन वाजू लागला. जपानची स्थानिक वेळ सकाळी 7.29 वाजण्याच्या सुमारास नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा घेण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास जपान पंतप्रधान कार्यालयाने उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरुन गेले असल्याचे ट्वीट केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : ...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
Stock Market : तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Gitte : महादेव गित्तेसह 4 आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची माहितीMahadev Gitte : महादेव गित्तेला हर्सूल जेलमध्ये पाठवलं, म्हणाला, वाल्मिकनेच आम्हाला मारलंABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 31 March 2025 संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सMaharashtra News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : ...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
Stock Market : तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
Weather Today: पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
Embed widget