Kim Jong Un : किम जोंग उनकडून शक्तिशाली देशांना धमकवण्याचा प्रयत्न? उत्तर कोरियाकडून नव्या वर्षात 6 क्षेपणास्त्र चाचण्या
Kim Jong Un : हुकूमशाह किम जोंग उन यांनी शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्या कारखान्याला भेट दिली. उत्तर कोरियाने 2022 मध्ये सलग 6 शस्त्रास्त्रांच्या चाचण्या केल्यानंतर तणाव वाढला आहे.
Kim Jong Un : उत्तर कोरिया (North Korea) सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. उत्तर कोरियाकडून या महिन्यात सहाव्यांदा क्षेपणास्त्र चाचणी (Missile Test) घेण्यात आली आहे. या वृत्ताला आता उत्तर कोरियाने दुजोरा दिला आहे. हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांनेही देशातील युद्धसामुग्रीशी संबंधित कारखान्यांना भेटी देऊन उत्तर कोरियाच्या नवीनतम शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांची पुष्टी केली आहे. या महिन्यातच उत्तर कोरियाने रणनीतिकदृष्ट्या निर्देशित क्षेपणास्त्र (Tactical Guided Missiles), बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile), दोन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची (Hypersonic Missiles) चाचणी घेतली आहे.
उत्तर कोरियाकडून नवीन शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांच्या वृत्ताला दुजोरा
उत्तर कोरियाचे राज्य माध्यम KCNA ने शुक्रवारी सांगितले की, उत्तर कोरियाने या आठवड्यात प्रगत लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची (Cruise Missile) आणि रणनीतिकदृष्ट्या मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (Tactical Guided Missiles) चाचणी केली. हुकूमशहा किम जोंग उनने मोठ्या शस्त्रास्त्र प्रणाली बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर कोरियाने 2022 मध्ये सलग सहा शस्त्रास्त्रांच्या चाचण्या केल्यानंतर तणाव वाढत आहे. एका महिन्यात एवढ्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर जगातील अनेक देशांनी त्याचा निषेध केला आहे.
उत्तर कोरियाने अलीकडच्या काही महिन्यांत नवीन क्षेपणास्त्रांच्या चाचण्या तीव्र केल्या आहेत. काही तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन काही सवलती आणि मागण्यांसाठी चर्चेची ऑफर देण्यापूर्वी क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे त्याच्या शेजारील राष्ट्रांवर आणि अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी त्याच्या विचारपूर्वक धोरणाचा आढावा घेत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट शिगेला? काय म्हणालं केंद्रीय आरोग्य मंत्रालय : वाचा सविस्तर
- मालमत्तेसाठी आईचा छळ करणाऱ्याला न्यायालयाचा दणका, मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे आदेश
- Viral New : सुरुंगाचा शोध घेणाऱ्या मागवा उंदराचा मृत्यू, हजारोंचे प्राण वाचवल्याबद्दल मिळालं होतं सुवर्ण पदक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha