एक्स्प्लोर

मालमत्तेसाठी आईचा छळ करणाऱ्याला न्यायालयाचा दणका, मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने एका वृद्घ महिलेला तिचा अधिकार मिळवून दिला आहे. मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध महिलेने न्यायालयात धाव घेतली होती.

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने एका वृद्ध महिलेला तिचा अधिकार मिळवून दिला आहे. मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या मुलाला घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. महिलेची मालमत्ता रिकामी करण्यासाठी मुलगा आणि सुनेला दिल्ली उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मालमत्ता रिकामी करण्याच्या आदेशाविरोधात मुलगा आणि सुनेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांनी 73 वर्षीय महिलेचा मुलगा आणि सुनेला 15 फेब्रुवारीपूर्वी तीन आठवड्यांच्या आत मालमत्ता रिकामी करण्याचे निर्देश देणारी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याच्या मुलांची परीक्षा सुरू असल्याने न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला आहे.

मालमत्ता हडप करण्यासाठी आईचा छळ
या वृद्ध महिलेचे नाव अंगूरदेवी असे आहे. न्यायालयाने पुढे सांगितले की, लग्नानंतर याचिकाकर्त्यांनी तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तसेच मालमत्ता हडप करण्यासाठी प्रत्येक वेळी तिच्यावर दबाव आणला. त्यांनी तिन्ही मालमत्ता ताब्यात घेतल्या, आईला मालमत्तेतून बाहेर फेकून दिले.

उच्च न्यायालयाने फेटाळली दाम्पत्याची याचिका
25 जानेवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेमध्ये न्यायालयाच्या आधीच्या आदेशााल आव्हान देण्यात आले होते. 10 जानेवारी 2022 रोजी न्यायालयाने मालमत्त ताब्यात घेण्याच्या वॉरंटला आव्हान देण्यात आले होते. खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्ता आणि त्याच्या पत्नीने या आदेशाविरुद्ध 2 ऑगस्ट 2021 रोजी विभागीय आयुक्त अपील प्राधिकरणाकडे अपील केले होते जे फेटाळण्यात आले होते. न्यायालयाने सांगितले की, 28 ऑक्टोबर 2021 रोजी विभागीय आयुक्तांनी ऑगस्ट 2021 च्या आदेशाला स्थगिती देण्याची जिल्हा दंडाधिकाऱ्यांची विनंती फेटाळली होती.

मालमत्तेवर आईचीच मालकी
त्याचवेळी, याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले आहे की, महिलेच्या सुनेने मालमत्तेत कायमस्वरूपी हिस्सा मिळावा म्हणून दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. सूनेचे म्हणणे आहे की मीही मालमत्तेची भागधारक आहे. यावर जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या आदेशाचा संदर्भ देत न्यायालयाने सांगितले की, असे आढळून आले आहे की याचिकाकर्त्या आईचे वय 73 वर्षे असून ती मालमत्तेची पूर्ण मालकीण आहे. ही मालमत्ता 1998 मध्ये प्रतिवादीचे वडील जय राम सिंह आणि आई अंगूरी देवी यांनी मिळून खरेदी केली होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suvendu Adhikari Networth: ना कार, ना सोनं, एका रूपयाचं कर्जही नाही, ममता बॅनर्जींचा पराभव करून बंगालचे मुख्यमंत्री बनणाऱ्या शुभेंदू अधिकारी याचं नेटवर्थ किती?
ना कार, ना सोनं, एका रूपयाचं कर्जही नाही, ममता बॅनर्जींचा पराभव करून बंगालचे मुख्यमंत्री बनणाऱ्या शुभेंदू अधिकारी याचं नेटवर्थ किती?
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: सगळं ठरलं, विजय थलपती शपथविधी घेण्यासाठी तयारही होते, पण ऐनवेळी फिस्कटलं, राज्यपालांनी घोषणाही पुढे ढकलली, नेमकं काय घडलं?
सगळं ठरलं, विजय थलपती शपथविधी घेण्यासाठी तयारही होते, पण ऐनवेळी फिस्कटलं, राज्यपालांनी घोषणाही पुढे ढकलली, नेमकं काय घडलं?
Tamil Nadu Politics: तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम, थलापती विजयच्या TVKकडे 116 आमदारांचा पाठिंबा, काँग्रेसने आमदारांना बंगळूरुला हलवले, व्हीसीकेची भूमिका ठरणार निर्णायक
तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम, थलापती विजय यांच्या TVKकडे 116 आमदारांचा पाठिंबा, काँग्रेसने आमदारांना बंगळूरुला हलवले, व्हीसीकेची भूमिका ठरणार निर्णायक

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case: बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग एसआयटीने ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग एसआयटीने ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Kiran Bidkar: नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
SSC Result 2026 Marathi: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
SSC Result: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
Share Market : अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
Embed widget