एक्स्प्लोर

Baltic Sea Methane Leak : समुद्रात फुटला 'मिथेन बॉम्ब', युरोपमध्ये हाहाकार

Methane Leak in Baltic Sea : बाल्टिक समुद्रातळाशी नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनमध्ये स्फोट झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची गळती होत आहे.

Baltic Sea Methane Leak News : बाल्टिक समुद्रामध्ये (Baltic Sea) पाईपलाईनचा स्फोट होऊन मोठी वायू गळती (Gas Leak) होत आहे. बाल्टिक समुद्रातळाशी 'नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन'मध्ये (Nord Stream Pipeline Rupture) स्फोट झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची (Methane) गळती होत आहे. बाल्टिक समुद्रामध्ये 100 मीटर खाली हा स्फोट झाला आहे. त्यामुळे मिथेन वायूची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. दर तासाला सुमारे 23 हजार किलो मिथेन गॅसची गळती होत आहे. यामुळे युरोपीय देशांवर मोठं संकट कोसळलं आहे.

काय आहे नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन?

नॉर्ड स्ट्रीम 2 (Nord Stream 2) ही रशियापासून जर्मनीला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी अंडरवॉटर पाईपलाईन आहे. या पाईपलाईनची  लांबी 1234 किलोमीटर असून ही बाल्टिक समुद्रात 100 मीटर खोल अंतरावर आहे. नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन बाल्टिक समुद्रातून जाते. या पाईपलाईनद्वारे गॅझप्रॉम आणि अनेक युरोपियन ऊर्जा कंपन्यांना पुरवठा केला जातो. 26 सप्टेंबरला पाईपलाईनमध्ये स्फोट झाला होता. यानंतरही या पाईपलाईनमध्ये अनेक स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. आता या स्फोटाचे काही सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत.

बाल्टिक समुद्रातील जैवविविधता धोक्यात

नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनच्या स्फोटामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची गळती होत आहे. यामुळे  बाल्टिक समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. दरम्यान, पाईपलाईन स्फोटासंदर्भात रशियावर गंभीर आरोप लावण्यात येत आहेत. युरोपीय देशांमधील इंधन पुरवठा बंद करण्यासाठी रशियाने पाईपलाईनाचा स्फोट घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनमधून दर तासाला 22,920 किलो मिथेन गॅस गळती होत आहे. हा गॅस 2 लाख 85 हजार किलो कोळशा जाळण्यासाठी पुरेसा आहे. मिथेन गॅस ग्लोबल वॉर्मिंगचं महत्त्वाचं कारण मानलं जातं, त्यामुळे ही मिथेन गळती युरोपीय देशांसाठी मोठी समस्या आहे.

मिथेनची आतापर्यंतची सर्वात मोठी गळती

संयुक्त राष्ट्र पर्यावरण उपक्रमने (UNEP - United Nations Environment Programme) सांगितलं की, 'नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन लवकर दुरुस्त न केल्यास मोठ्या प्रमाणात सागरी जीवसृष्टीला हानी पोहोचेल. याशिवाय सागरी वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. बाल्टिक समुद्राखालील नॉर्ड स्ट्रीम गॅस पाइपलाइन फुटणे ही मिथेनची आतापर्यंतची सर्वात मोठी गळती आहे.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget