Nobel Prize 2022: भौतिक शास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन वैज्ञानिकांना विभागून पुरस्कार जाहीर
Nobel Prize 2022: रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर आणि अँटोन झेलिंगर यांना 2022 च्या भौतिक शास्त्रातील (Physics Science) नोबेल पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
Nobel Prize 2022 in Physics: यंदाच्या नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा करण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) भौतिकी शास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदा तीन वैज्ञानिकांना भौतिकी शास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन अॅस्पेक्ट (Alain Aspect), जॉन एफ क्लॉझर (John F. Clauser) आणि अँटोन झेलिंगर (Anton Zeilinger) यांना 2022 च्या भौतिक शास्त्रातील (Physics Science) नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही वैज्ञानिकांना क्वांटम माहिती विज्ञान आणि फोटॉनवर केलेल्या संशोधनबद्दल नोबेल पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
सोमवारी (3 ऑक्टोबर) स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो (Svante Paabo) यांना यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल (Nobel Prize in Medicine) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर आता भौतिक शास्त्राच्या नोबेल पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर आणि अँटोन झेलिंगर यांना मिळाला आहे.
अॅलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे आहे. ते पॅरिस आणि स्केले यूनिवर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. जॉन एफ क्लॉजर हे अमेरिकन संशोधक आणि प्राध्यापक आहेत. अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियातील व्हिएन विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि संशोधक आहेत.
2021 मध्ये देखील तीन वैज्ञानिकांना मिळाला होता पुरस्कार
2021 मध्ये देखील भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना मिळाला होता. स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमॅन आणि जियोर्जियो पेरिसी यांना गेल्यावर्षी भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा सध्या होत आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत यंदाचे सर्व नोबेल पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत.
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 4, 2022
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2022 #NobelPrize in Physics to Alain Aspect, John F. Clauser and Anton Zeilinger. pic.twitter.com/RI4CJv6JhZ
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या