एक्स्प्लोर
पठाणकोट हल्लाचा मास्टरमाईंड मसूद अझहरविरोधात आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली : पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आरोपपत्र दाखल केलं आहे. जैश ए मोहम्मदचा मास्टरमाईंड मसूद अझहरविरोधात हे आरोपपत्र आज दाखल करण्यात आलं आहे. एनआयएनं मसूद अझहरसोबतच त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर आणि त्याच्या दोन हस्तकांचं नावही आरोपपत्रात दाखल करण्यात आलं.
पंचकुला विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं गेलंय. यात शहीद लतिफ आणि काशीफ जान या दोन हस्तकांची नावं आहेत. भारतीय दंड संहितेतील आर्म्स अक्ट, स्फोटकविरोधी कायदा आणि सार्वजनिक जागेचं नुकसानविरोधी अक्ट अशा कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप मसूद अझहर आणि त्याच्या साथीदारांवर लावण्यात आला आहे.
आरोपपत्रामध्ये हेच सर्व गुन्हे जैश ए मोहम्मदच्या नासिर हुसेन, हाफिज अबु बक्र, उमर फारुख, आणि अब्दुल कयुम यांच्या विरोधातही एअरबेसवर हल्ला केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
एनआयएनं पाकिस्तानकडून झालेल्या या भ्याड हल्ल्याचे तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे जमवले आहेत. तसंच जैश ए मोहम्मदच्या सदस्यांचं इमेल आणि चाटवरील संभाषणही अमेरिकेकडून मिळवलं आहे.
कोण आहे मसूद अझहर ?
मसूद अझहरला 1994 मध्ये काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी अटक करण्यात आली होती. 1999 मध्ये इंडिअन एअरलाईन्सचं विमान 814चं कंधारमधून अपहरण करत त्याची सुटका करुन घेतली होती.
पाकिस्तानमध्ये जैश ए मोहम्मदच्या स्थापनेपूर्वी मसूद अझहर हरकर उल अन्सार नावानं जोडला गेला. त्यानंतर त्यानं आपल्या काश्मीरमधील दहशतवादी कारवाया सुरु केल्या.
त्याच्यावर 2001 साली संसदेवर हल्ला करण्याचा आरोपही आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement