एक्स्प्लोर

Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी

केवळ 100 मीटर उंचीवरील पर्वतरांगा मानल्या जातील या अरवलीच्या नवीन व्याख्येवर झालेल्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली.

Aravali Hills: जनआंदोलनासमोर सपशेल लोटांगण घालताना केंद्र सरकारने अखेर राज्यांना अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर (mining leases) संपूर्ण बंदी घालण्याचे आणि संरक्षित क्षेत्रे (protected zones) विस्तारित करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ 100 मीटर उंचीवरील पर्वतरांगा मानल्या जातील या अरवलीच्या नवीन व्याख्येवर झालेल्या आंदोलनानंतर कारवाई करण्यात आली. या निर्णयाचा उद्देश दिल्लीपासून गुजरातपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगापैकी एक असलेल्या अरवलीचे संरक्षण आणि जतन करणे हा आहे.

अनियमित खाणकामावर नियंत्रण

या निर्देशामुळे गुजरातपासून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रापर्यंत (NCR) पसरलेल्या अरावलीला अखंड भूवैज्ञानिक कणा (continuous geological ridge) म्हणून जपले जाईल आणि संपूर्ण प्रदेशातील अनियमित खाणकामावर नियंत्रण येईल. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन (ICFRE) ला पर्यावरणीय, भूवैज्ञानिक आणि लँडस्केप-स्तरीय मूल्यांकनांवर आधारित खाणकाम करण्यास मनाई असलेले पुढील झोन (क्षेत्रे) ओळखण्याचे निर्देश दिले आहेत.  

सध्या कार्यरत असलेल्या खाणींसाठी, राज्य सरकारांना पर्यावरणाच्या संरक्षणाचे कठोर पालन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले की, विशेषत: मुख्य, संरक्षित आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रांमध्ये, ज्यात एनसीआरचा समावेश आहे, कोणत्याही नवीन खाणपट्ट्यांना परवानगी दिली जाणार नाही सर्वोच्च न्यायालयाने अरावलीची एक नवीन व्याख्या स्वीकारली आहे, ज्यानुसार अरावली जिल्ह्यांमधील स्थानिक भूभागापासून 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या कोणत्याही भूभागास अरवली हिल्स म्हणून वर्गीकृत केले जाते. या नवीन व्याख्येमुळे जनआक्रोश सुरु होता. कारण बहुतेक भूभाग 100 मीटरच्या मर्यादेखाली येत असल्याने, 90 टक्क्यांपेक्षा जास्त पर्वतरांग खाणकामासाठी खुली होऊ शकते, अशी भीती आहे.

उत्तर भारताचे नैसर्गिक वायु फिल्टर

राजस्थानसाठी अरवली पर्वतरांगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा प्रदेश थार वाळवंट आणि पूर्व भारत यांच्यामध्ये एक नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतो. तज्ञांच्या मते, अरवली पर्वतरांगांच्या उपस्थितीमुळे राजस्थानातील अनेक भाग पूर्णपणे वाळवंट होण्यापासून रोखले जाते. या टेकड्या मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग कमी करतात, ज्यामुळे पाऊस पडतो आणि भूजल पुनर्भरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. बनास, लुणी आणि साबरमती सारख्या नद्या अरवली पर्वतरांगेत उगम पावतात आणि वाहतात, ज्यामुळे राज्यासाठी जलसुरक्षेचा आधार मिळतो. उत्तर भारताच्या संदर्भात अरवली पर्वतरांगांची भूमिका आणखी महत्त्वाची बनते. ही पर्वतरांग थार पर्वतरांगातून येणारी धूळ आणि उष्ण वारे दिल्ली-एनसीआर आणि गंगेच्या मैदानापर्यंत पोहोचण्यापासून मोठ्या प्रमाणात रोखते. पर्यावरण तज्ञांचा असा विश्वास आहे की जर अरवली पर्वतरांग कमकुवत झाली तर उत्तर भारतात वायू प्रदूषण, तापमान वाढ आणि पाण्याची कमतरता वाढू शकते. म्हणूनच याला "उत्तर भारताचे नैसर्गिक वायु फिल्टर" असेही म्हणतात.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget